बारामती, पुणे : बारामतीत दांपत्याचा (Crime News) खून झाल्याने खळबळ उडाली आहे. बारामती शहरातील जामदार रोडवरील सोसायटीत पती-पत्नीची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या नेमकी का झाली कशामुळे झाली? याची माहिती पोलीस घेत आहेत. परंतु बारामती ही सुरक्षित आहे अशी भावना लोकांची असतानाच गेल्या काही दिवसापासून बारामतीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. आजच्या खुनेच्या घटनेने बारामती शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


सचिन महालिंग वाघोलीकर आणि सारिका सचिन वाघोलीकर, असे या दाम्पत्याचे नाव आहे. या दोघांचेही मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत सापडले आहेत. यात पोलिसांना दोघांच्याही अंगावर वेगळ्या खूना दिसल्या त्यामुळे दोघांची हत्या झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या सचिन यांचा मित्र सकाळी अकराच्या दरम्यान घरी आले होते. त्यावेळी हा सगळा समोर आला.या सगळ्या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहे. सध्या कोणवरही संशय व्यक्त केला जात नाही आहे. मात्र चौकशी झाल्यावर हत्येची माहिती पुढे येईल.घरातील बेडरुममधील कपाट व दुसऱ्या खोलीतील डबे अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आले आहेत.  या दोघांनाही दोन मुलं आणि एक मुलगी आहे.