8th Pay Commission: सध्या देशात सातवा वेतन आयोग लागू आहे. आगामी दीड वर्षांनी आठवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. प्रत्येक दहा वर्षांनी सरकारतर्फे नवा वेतन आयोग लागू केला जातो. सातवा वेतन आयोग जानेवारी 2016 मध्ये लागू करण्यात आला होता. म्हणजेच आता आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी जानेवारी 2016 मध्ये लागू केल्या जातील. दरम्यान, केंद्र सरकार लवकरच आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत तयारी चालू खरू शकते. आर्थिक वर्ष 2024-25 साठीच्या अर्थसंकल्पात या आठव्या वेतन आयोगाबाबत काही घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे.
एक कोटीपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
आठव्या वेतन आयोगाची केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा आहे. हा वेतन आयोग स्थापन करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर चालू करावी, अशी मागणी केली जात आहे. जॉइंट कन्सल्टिव्ह मशिनरी फॉर सेन्ट्रल गव्हर्नमेंट एम्पलॉइजच्या राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. त्यांनीदेखील आपल्या या पत्रात आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी केली आहे. आठवा वेतन आयोग स्थापन झाल्यावर देशभरातील साधारण 49 लाख शासकीय कर्मचारी तसेच 68 लाख पेन्शनधारकांना म्हणजेच साधारण 1 कोटीपेक्षा अधिक लोकांना आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा फायदा होणार आहे.
23 जुलै रोजी सादर होणार अर्थसंकल्प
अर्थमंत्री नीर्मला सीतारामन येत्या 23 जुलै रोजी आर्थिक वर्ष 2024-25 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून आठव्या वेतन आयोगाची स्थापना करावी अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे यावेळच्या अर्थसंकल्पात या वेतन आयोगाबाबत काही घोषणा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फिटमेंट फॅक्टरवर ठरणार पगार
आठव्या वेतन आयोगाकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसंदर्भात शिफारश केली जाते. यावेळी फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करून कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचे आयोगातर्फे सांगितले जाऊ शकते. फिटमेंट फॅक्टरच्या मदतीनेच कर्मचाऱ्यांचा पगार, पे मॅट्रिक्स ठरवला जातो.
यावेळी फिटमेंट फॅक्टर किती असू शकतो.
पगार नेमका किती वाढणार?
काही दिवसांपूर्वीच्या फायनॅन्शिल एक्स्प्रेसमधील एका रिपोर्टनुसार यावेळी फिटमेंट फॅक्टर 3.68 पट निश्चित केला जाऊ शकतो. असे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आठ हजार रुपयांची वाढ होऊ शकते. त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे कमीत कमी मूळ वेतन 18,000 हजार रुपयांनी वाढून थेट 26,000 रुपये होऊ शकते. तर मूळ वेतन, महागाई भत्ता आदी मिळून कर्मचाऱ्यांच्या पगारात 25-35 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. सातव्या वेतन आयोगात 2.57 पट फिटमेंट पॅक्टर निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर कमीत कमी मूळ वेतन 18 हजार रुपये झाले होते.
हेही वाचा :
बजेट सादर होताच 'हे' तीन स्टॉक तुम्हाला करणार श्रीमंत? वाचा सविस्तर
तब्बल 3.50 लाख रुपये किलोंचा आंबा, बागेत लावला CCTV; भारतातल्या 'या' आंब्याची जगभरात चर्चा!