बजेट सादर होताच 'हे' तीन स्टॉक तुम्हाला करणार श्रीमंत? वाचा सविस्तर
वित्त वर्ष 2024-25 साठी येत्या 23 जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर भारतीय भांडवली बाजारातही मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या काळात शेअर मार्केट चांगेलच वर जाऊ शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, एकीकडे अर्थसंकल्प सादर करण्याआधी कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी, असे विचारले जात आहे. यामध्ये तीन प्रमुख शेअर्सचे नाव घेतले जात आहे.
ओस्तवाल या ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार अर्थसंकल्प सादर केल्यानंत सार्वजनिक क्षेत्रातील (PSU) कंपन्यांचे शेअर्स वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून एसबीआय या कंपनीचा शेअर शेअर बाजारावर चांगली कामगिरी करत आहे.
भविष्यातही एसबीआय हा शेअर चांगला परतावा देऊ शकतो. सध्या हा शेअर 868.65 रुपयांवर आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर हा शेअर वाढू शकतो. ओस्तवालने एसबीआयच्या शेअरसाठी 1100 रुपयांचे टार्गेट दिले आहे.
ओस्तवालने BHEL या कंपनीचे शेअरही चांगला परतावा देईल, असे सांगतिले आहे. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर हा शेअर 450 रुपयांपर्यंत मजल मारू शकतो, असे ओस्तवालचे मत आहे.
SAIL शेअरमध्ये गुंतवणूक करायची असल्यास 240 रुपयांचे टार्गेट ठेवायला हवे, असे ओस्तवालने सांगितले आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)