Miyazaki Mango : सध्या उत्तर प्रदेशमधील सहारनपूर (Uttar Pradesh Saharanpur) येथील बलियाखेडी येथील शेतकरी संदीप चौधरी यांच्या शेतातील दोन झाडांची देशभरात चर्चा होत आहे. त्यांनी शेतात दोन आंब्याची झाडे लावली आहेत. ही आंब्याची झाडे 'मियाझाकी' (Miyazaki Mango) वाणाची असून या आंब्यांची किंमत 2.70 लाख रुपयांपासून 3.50 लाख रुपये प्रतिकिलो एवढी आहे. आंब्याचे हे वाण जपानच्या मियाझाकी विद्यापीठात विकसित करण्यात आले आहे. या आंब्याचे जपानी नाव 'टाइयो नो टमँगो' असे आहे.
आंबे विकायला काढल्यास झटक्यात लखपती
खुद्द संदीप चौधरी यांनी आंब्याच्या या दोन झाडांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार या दोन्ही झाडांवर फक्त तीन आंबे लागलेले आहेत. या आंब्यांची किंमत लाखो रुपये आहे. हे आंबे विकायला काढल्यास ते झटक्यात लखपती होऊ शकतात. पण चौधरी यांना देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांना हे आंबे द्यायचे आहेत. मियाझाकी हा आंबा खायला गोड असतो. या आंब्यांत अँटीऑक्सिडंट, बीटा-कॅरोटीन आणि फॉलिक अॅसिड असे घटक असतात. कर्करोगाशी सामना करण्यासाठी हा आंबा उपयुक्त ठरतो असा दावा केला जातो.
7500 रुपयांना खरेदी केले एक झाड
शेतकरी संदीप चौधरी यांनी 9 महिन्यांआधी मियाझाकी या आंब्याची दोन झाडे कोलकाता येथून आणले होते. तेव्हा एका झाडासाठी त्यांना 7500 रुपये मोजावे लागले होते. जैविक पद्धतीने त्यांनी आंब्याचे ही झाडे वाढवलेली आहेत. आंब्यांची ही झाडे फक्त तीन फूट उंचीची आहेत. या झाडाच्या आंब्याचे वजन 300 ते 350 ग्रॅमपर्यंत असते.
सुरतच्या व्यापाऱ्यांना खरेदी करायचाय हा आंबा
संदीप यांच्या माहितीनुसार हा आंबा खरेदी करण्यासाठी त्यांना अनेक ठिकाणाहून कॉल येत आहेत. सूरतचे पकडा व्यावसायिक प्रवीण गुप्ता यांच्याकडून त्यांना फोन कॉल केला जातोय. मात्र ते या आंब्यांना ते विकणार नाहीत. हे आंबे मौल्यवान असल्यामुळे संदीप यांच्याकडून त्याची राखण केली जात आहे. त्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहेा. हा कॅमेरा 360 अशांनी फिरतो. त्यांच्या बागेत कोणी जाण्याचा प्रयत्न केलाच तर या कॅमेऱ्याच्या माध्यमातून संदीप यांच्या मोबाईलवर नोटिफीकेशन जाते. दरम्यान, संदीप या आंब्यांचे नेमके काय करणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा :
कोट्यावधींचे 24 भव्य आश्रम, आलिशान वाहनांचा ताफा, सुरक्षेसाठी 5000 सैनिक, भोलेबाबाची संपत्ती किती?
तीन मोठे आयपीओ सूचिबद्ध होणार, गुंतवणूकदारांवर पडणार पैशांचा पाऊस?