Polycab India Stock Crash : आयकर विभागाने (Income Tax) जारी केलेल्या एका निवेदनानंतर एका कंपनीचे आज शेअर बाजारात (Share Market) दिवाळंच निघाले आहे. मागील 2023 मध्ये शेअरधारकांना मल्टिबॅगर रिटर्न देणारी देशातील दिग्गज वायर आणि केबल कंपनी पॉलिकॅब इंडियाच्या (Polycab India) शेअर दरात गुरुवारी 22.61 टक्क्यांची घसरण दिसून आली. आज बाजार बंद झाला तेव्हा 3801 रुपयापर्यंत घसरला.
बुधवारी सायंकाळी उशिरा प्राप्तिकर विभागाने प्रसिद्धीपत्रक जारी करून एका वायर अँड केबल कंपनीवर छापा टाकल्याची माहिती दिली.त्यानंतर शेअर बाजार उघडताच पॉलीकॅबच्या शेअर दरात घसरण झाली. मागील काही दिवसांत आयकर विभागाने पॉलिकॅबच्या कार्यालयांवर छापे मारले होते.
आज बाजारील व्यवहार सुरू होताच, सकाळी शेअर 10 टक्क्यांच्या घसरणीसह उघडला. यानंतर, शेअर 15 टक्के आणि नंतर 20 टक्क्यांनी घसरला आणि नंतर लोअर सर्किटला लागला. जेव्हा सर्किट उघडले तेव्हा स्टॉक 22.61 टक्क्यांनी घसरून 3801 रुपयांवर आला.पॉलीकॅबचे शेअर्स एकाच दिवसात 1110.85 रुपयांनी घसरले. बुधवारी शेअर 4911.85 रुपयांवर बंद झाला होता.आजच्या व्यवहाराअंती पॉलीकॅब 21.04 टक्क्यांच्या घसरणीसह 3878.46 रुपयांवर बंद झाला.
आयकर विभागाच्या कारवाईनंतर शेअर दरात घसरण सुरू
पॉलीकॅब इंडियावर 22 डिसेंबर 2023 रोजी आयकर विभागाने छापा मारला होता. त्याच्या एक दिवस आधी 21 डिसेंबर रोजी स्टॉक 5619 रुपयांवर बंद झाला होता. त्या दिवसापासून शेअर 32.35 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या वर्षी, 11 जानेवारी 2023 रोजी, पॉलीकॅबचा शेअर 2671 रुपयांवर व्यवहार करत होता, जो वर्षभरात 12 डिसेंबर 2023 रोजी 5733 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. मात्र आयकर विभागाने कंपनीच्या जागेवर टाकलेल्या छापेमारीनंतर शेअर दरात मोठी घट झाली आहे.
बुधवार, 10 जानेवारी 2024 रोजी, आयकर विभागाने प्रसिद्धीपत्रक जारी करून सांगितले की, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, दमण, हालोल आणि दिल्ली येथे वायर आणि केबल कंपनीच्या फ्लॅगशिप ग्रुपच्या एकूण 50 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. 22 डिसेंबर 2023. आहे. या छाप्यात कर विभागाला 1000 कोटी रुपयांची रोकड विक्री आढळून आली आहे, ज्याची कोणत्याही खात्यात नोंद नाही. त्याशिवाय काही कागदपत्रेही सापडली आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर स्टॉक एक्सचेंजने 11 जानेवारी 2024 रोजी पॉलीकॅबच्या स्टॉकमध्ये झालेल्या घसरणीनंतर कंपनीला स्पष्टीकरण देण्यासाठी नोटीस बजावली आहे. दरम्यान, पॉलीकॅबने 10 जानेवारी 2024 रोजी एक्स्चेंजमध्ये नियामक फाइलिंगमध्ये कर चुकवेगिरीचे वृत्त फेटाळून लावले होते.
(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. शेअर विषयक सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)