PM Narendra Modi Nashik Visit नाशिक : २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या (National Youth Festival) आयोजनाची जबाबदारी यंदा महाराष्ट्रावर (Maharashtra) सोपवण्यात आली आहे. या महोत्सवाचे आयोजन नाशिकमध्ये (National Youth Festival in Nashik) होत असल्याने शहरात गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांची मांदियाळी दिसून येत आहे. प्रशासनाकडून या महोत्सवाची जय्यत तयारी केली जात आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते शुक्रवारी नाशिकच्या तपोवन येथील मोदी मैदानावर (Modi Maidan) राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात दाखल होताच त्यांचा रोड शो देखील होणार आहे. संपूर्ण नाशिककर पंतप्रधान मोदींच्या रोड शोची (PM Narendra Modi Road Show in Nashik) आतुरतेने वाट पाहत आहेत. 


मिरची सिग्नलपासून रोड शोला सुरुवात


पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा रोड शो नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील मिरची सर्कलपासून (Mirchi Circle Nashik) ते जनार्दन स्वामी मठ चौकापर्यंत (Janardhan Swami Math Nashik) होईल. महामार्गावरील एका बाजूने रोड शो तर दुसऱ्या बाजूने सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे एक ते दीड लाख लोक या रोड शोला उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुमारे १.२ किमीचे रोड शोचे अंतर असेल. 


तीस गाड्यांच्या ताफ्याने केली ट्रायल रन


गुरुवारी रोड शोच्या मार्गाची प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली. तसेच मार्गावरून ट्रायल रन देखील घेण्यात आली आहे.  नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Nashik Police Commissioner Sandip Karnik) तसेच पंतप्रधान मोदींची सुरक्षा व्यवस्था, शासकीय अधिकाऱ्यांकडून ट्रायल रन करण्यात आली. सुमारे तीस गाड्यांचा ताफा यावेळी दिसून आला.  


सभास्थळी चोख तपासणी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपोवनातील सभास्थळी नागरिकांची चोख तपासणी करून प्रवेश दिला जाणार आहे. सभेच्या मैदानात कोणालाही काहीच नेता येणार नाही. पोलीस अंमलदारांकडून धातूशोधक यंत्रांसह  कृत्रिमरित्या शारीरिक तपासणी होणार आहे. त्यानंतरच सभास्थळी प्रवेश दिला जाईल. 


इतर महत्वाच्या बातम्या


PM Narendra Modi Nashik Visit : एसआरपीएफ, बॉम्ब शोधक-नाशक पथकं, हजारो पोलीस; नाशिकला प्राप्त होणार छावणीचे स्वरूप


PM Narendra Modi Nashik Visit : नाशिकच्या काळाराम मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते कशी होणार पूजा? जाणून घ्या एका क्लिकवर