Whatsapp Scam : सध्या सोशल मीडियावर, ॲप्सवर ऑनलाईन (Whatsapp ) फ्रॉड वाढताना आपल्याला दिसत आहेत. हे स्कॅम्स करणाऱ्या स्कॅमर्सचं टार्गेट व्हॉट्सअप असतं. कारण याच व्हॉट्सॲपवर साधारणतः मिलियन्स ग्लोबल युजर्स आहेत. तुमचा विश्वास मिळवून तुमची प्रायव्हेट आणि आर्थिक माहिती चोरण्यासाठी व्हॉट्सॲप स्कॅमर्स वेगवेगळे पर्याय शोधत असतात. तुम्हाला अनोळखी नंबर वरून येणाऱ्या मेसेजपासून सावध राहण्याचा सल्ला अनेक सायबर एक्सपर्ट देतात.  तुमचा फोन प्रवास करताना हरवला आहे का? असा मेसेज आला तर सावध राहा.


स्कॅमर्स अनेक वेळा कायदेशीर कंपन्या, बँक, कुरियर किंवा सरकारी संस्थांमधून बोलत असल्याचेस दाखवतात. ते तुम्हाला अनेकदा लिंक्स पाठवतात आणि त्यावर क्लिक करायला सांगतात. लवकर पैसे कमावणे, रिवॉर्ड्स  जॉब ,लॉटरी तिकीट, इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी किंवा लोन्स अशा दिसणाऱ्या बातम्या बऱ्याच वेळा स्कॅम असतात. यामुळे अशा मेसेजच्या जाळ्यात तुम्ही स्वतः अडकू देऊ नका. अशा प्रकारच्या स्कॅम्सपासून वाचण्यासाठी आज आपण काही टिप्स पाहणार आहोत. 


मेसेजला रिप्लाय देण्यापूर्वी मेसेज पाठवणाऱ्याची माहिती घ्या


जर तुम्हाला एखाद्या अनोळख्या व्यक्तीकडून मेसेज आला तर त्याला रिस्पॉन्स देण्यापूर्वी त्याची आयडेंटिटी तपासून पाहा.जेव्हा व्हिडिओ/ व्हॉइस कॉल सुरू असेल किंवा तुम्हाला तो कॉन्टॅक्ट नंबर माहित असेल तेव्हाच फक्त तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता.तसेच तुमचा फोन प्रवास करताना हरवला आहे का? असा मेसेज एखाद्या व्यक्तीकडून आला तर अशा मॅसेज पासून पण सावध राहा. स्कॅमर्स तुमचा विश्वास बसण्यासाठी काहीही करू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. 
 


खासगी माहिती कोणालाही पाठवू नका!


तुमची खासगी माहिती कोणालाही पाठवू नका. जसे की पासवर्ड ,पीन, बँक अकाउंट डिटेल,घराचा पत्ता किंवा मग पर्सनल डेटा. जरी तुमच्या जवळच्या मित्राकडून तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज आला तरी खात्रीपूर्वक तपासून नंतरच त्याला रिप्लाय द्या. 


टू फॅक्टर ऑथेंटीकेशन ऑन ठेवा!


टू फॅक्टर ऑथेंटीकेशन ॲड करण्यासाठी तुमच्या व्हॉट्सॲप मध्ये लॉगिन करताना तुमच्या पासवर्ड बरोबर एक कोड टाकणे गरजेचे असते. ही एक्स्ट्रा व्हेरिफिकेशन लेयर्स स्कॅमरला तुमचं व्हॉट्सॲप अकाउंट हॅक करण्यापासून रोखू शकते. तुमचे सगळे सोशल मीडिया ॲप्स कायम अपडेट ठेवा. व्हॉट्सॲप अपडेट ठेवा.  तुम्हाला जर एखादा संशयास्पद मेसेज आढळला तर तो व्हॉट्सॲपचा स्पॅम रिपोर्टिंग क्रमांक +44 7598 505694 यावर फॉरवर्ड करा. यामध्ये असणारे App's Report ऑप्शन देखील तुम्ही वापरू शकता.