एक्स्प्लोर

PM Kisan : 'या' तीन कारणांमुळं काही शेतकऱ्यांचे पीएम किसानचे 2000 रुपये थांबवले, केंद्र सरकारनं दिली अपडेट

PM Kisan : पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये 2 ऑगस्टला जारी करण्यात आले. काही शेतकऱ्यांची रक्कम थांबवण्यात आली आहे.

नवी दिल्ली  : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीची रक्कम पाठवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला होता. 2 ऑगस्ट रोजी 9.70 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20500 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांच्या खात्यात पीएस किसान सन्मान निधीचे पैसे आलेले नाहीत. पीएम किसान सन्मान निधीच्या पोर्टलवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून पीएम किसान सन्मान निधी योजना चालवली जाते. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर कोणती लाभार्थी योजनेतून वगळण्यास पात्र ठरू शकतात याबाबत माहिती दिली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटनुसार याबाबत प्रत्यक्ष पडताळणी होईपर्यंत अस्थायी रुपयात त्यांचा लाभ रोखण्यात आल्याची माहिती दिली. 

प्रमुख कारणं

पीएम किसान सन्मान निधी योजनेतील ज्या लाभार्थ्यांनी 1 फेब्रुवारी 2019 नंतर शेतजमीन खरेदी केली असेल, ते या योजनेस पात्र नसतील.  याशिवाय एकाच कुटुंबातील एक पेक्षा अधिक लाभार्थी लाभ घेत असतील तर त्यांची चौकशी केली जाईल. उदा. पती पत्नी, वयस्कर व्यक्ती  किंवा लहान मुलं यांनी लाभ घेणे. 

चुकीची माहिती

आधार कार्ड, बँक खाते किंवा जमीन रेकॉर्ड यामध्ये फरक असल्याचं दिसून आल्यानं देखील पीएम किसानचा लाभ थांबवला जाऊ शकतो. पीएम किसानच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांना ई केवायसी करावी लागेल. 

पीएम किसान सन्मान निधी स्टेटस कसं तपासायचं?

ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळालेल नाहीत ते शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पीएम किसान वेबसाईटवर Know Your Status वरुन पेमेंट स्टेटस तपासता येईल.  पीएम किसान मोबाईल अॅप आणि किसान ई-मित्र चॅटबॉट वरुन देखील पेमेंट स्टेटस तपासू शकता.

पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी विकास कल्याण मंत्रालयाकडून चालवली जाते. ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरु करण्यात आली होती. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दरमहा 6000 रुपये एका वर्षात दिले जातात.  आतापर्यंत या योजनेतून शेतकऱ्यांना 20 हप्त्यांचे प्रत्येकी 2 हजार रुपयांप्रमाणं 40 हजार रुपये मिळाले आहेत.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate: सोनं पुन्हा दीड लाखांच्या पार तर चांदी 248000 वर; सलग दुसऱ्या दिवशी दरात वाढ; आता खरेदी करावी का?
सोनं पुन्हा दीड लाखांच्या पार तर चांदी 248000 वर; सलग दुसऱ्या दिवशी दरात वाढ; आता खरेदी करावी का?
Gold Silver Rate : सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Embed widget