एक्स्प्लोर

भाजपचा विजय झाल्यास पेट्रोलचे दर होणार कमी, 'या' केंद्रीय मंत्र्यानं व्यक्त केला विश्वास

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Assembly elections) होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून विविध आश्वासने दिली जात आहेत.

Petrol Price : देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Assembly elections) होत आहेत. यामध्ये राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना खुश करण्यासाठी भाजप वेगवेगळी आश्वासनं देत आहे. 25 नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जर विजय मिळवला तर पेट्रोलचे दर (Petrol prices) कमी होऊ शकतात, असे वक्तव्य केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केलं आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल किमान 11.80 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्याकडून मोठी माहिती समोर येत आहे. 25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला तर राजस्थानमध्ये पेट्रोलचे दर कमी होऊ शकतात, असे हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे. जयपूरमध्ये एका निवडणूक कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणाले की, राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आल्यास राज्यात काय बदल घडेल, असा प्रश्न मला विचारला जात आहे. सर्व प्रथम, माझा विश्वास आहे की भाजप पुढे आहे. सरकार स्थापन करण्याचा निर्धार आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर राजस्थानमध्ये पेट्रोलच्या किंमती देशाच्या इतर भागांच्या बरोबरीने आणण्याचे काम करू. राजस्थानमध्ये पेट्रोल स्वस्त होईल, आम्ही निवडून आलो तर ते किमान 11.80 रुपयांनी स्वस्त होईल असे सिंह म्हणाले. 

राजस्थानमध्ये पेट्रोल सर्वात महाग का?

राज्यातील काँग्रेस सरकारने लागू केलेल्या अतिरिक्त सेसमुळं राजस्थानमध्ये पेट्रोलची किंमत देशात सर्वाधिक आहे, असा आरोप पुरी यांनी केला आहे. राजस्थानमधील काँग्रेस सरकारनं गेल्या काही वर्षांत पेट्रोल आणि डिझेलवरील अतिरिक्त शुल्कातून 35,975 कोटी रुपये जमा केले आहेत. गेल्या दोन वर्षांत, राजस्थान सरकारने नोव्हेंबर 2021-2022 आणि 2022-2023 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवरील अतिरिक्त उपकरातून 35,975 कोटी रुपयांचा कर गोळा केला आहे. 

18 राज्यांचे 32,597 कोटी रुपये कर संकलन

दिल्ली, उत्तराखंड, नागालँड, लक्षद्वीप, मणिपूर, लडाख, दमण आणि दीव, जम्मू आणि काश्मीरसह या 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे कर संकलन 32,597 कोटी रुपये असल्याचे पुरी यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

संपूर्ण देशात पेट्रोलचा सरासरी दर 96.72 रुपये आहे.

आज संपूर्ण देशात पेट्रोलचा सरासरी दर 96.72 रुपये प्रति लिटर आहे. परंतु राजस्थानच्या गंगानगरमध्ये पेट्रोलचा सध्याचा दर 113.34 रुपये प्रति लिटर आहे. केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर जास्त कर लादत असल्याच्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विधानावर प्रत्युत्तर देताना मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, त्यांनी प्रथम आपल्या राज्याच्या कारभाराकडे लक्ष द्यावे.

3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार 

राजस्थान विधानसभा निवडणुकीनंतर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 99 जागा जिंकल्या होत्या. 200 सदस्यांच्या सभागृहात भाजपने 73 जागा जिंकल्या होत्या. अखेर गेहलोत यांनी बसपा आमदार आणि अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या:

नवीन वर्षात सर्वसामान्यांना मिळणार दिलासा, पेट्रोलच्या दरात होणार एवढ्या दराची घसरण 

महत्त्वाच्या बातम्या

Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Dabur Products Ban : 'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘अॅनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘अॅनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Nitin Gadkari E20 Petrol: नितीन गडकरींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, E20 इंधनाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर, AI व्हिडीओ हटवण्याचे आदेश
नितीन गडकरींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, E20 इंधनाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर, AI व्हिडीओ हटवण्याचे आदेश
Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Embed widget