एक्स्प्लोर

ना दिल्ली ना मुंबई, 'या' राज्यात केला सर्वात जास्त पेट्रोलचा वापर, जाणून घेऊयात सविस्तर माहिती

मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढत आहेत. ज्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होतोय. नजीकच्या भविष्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शख्यता व्यक्त केली जात आहे.

Petrol News : मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढत आहेत. ज्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होत आहे. नजीकच्या भविष्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शख्यता व्यक्त केली जात आहे. यावर सध्या कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसली तरी, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचे केलेल्या आवाहनामुळे लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोणत्या राज्यात सर्वाधिक पेट्रोलचा वापर होतो याबाबतची माहिती तुम्हाला आहे का?

ज्या राज्यांमध्ये पर्यटकांची सर्वाधिक वर्दळ असते, तिथे वाहनांची वर्दळही जास्त

भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये दरडोई इंधनाचा वापर वेगवेगळा आहे. ज्या राज्यांमध्ये पर्यटकांची सर्वाधिक वर्दळ असते, तिथे वाहनांची वर्दळही जास्त असते, ज्यामुळे वाहनांची जास्त वर्दळ आणि कमी अंतराचे प्रवास यांमुळे पेट्रोलचा वापर जास्त होतो. येथे पर्यटनाशी संबंधित भाड्याची वाहने आणि व्यावसायिक वाहने देखील मोठ्या संख्येने चालतात. या यादीत गोवा अग्रस्थानी आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणात पेट्रोलचा वापर केला जातो. दर 100 लोकांमागे दररोज अंदाजे 52.4 लिटर पेट्रोलचा वापर होतो. हे राष्ट्रीय सरासरीच्या जवळपास पाच पट आहे. पुदुचेरी दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे दरडोई वापर 41 लिटर आहे. चंदीगड तिसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे दरडोई वापर 37.8 लिटर आहे. दरम्यान, दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळं इंधनाच्या मागणीत देखील वाढ होत आहे.

या राज्यांमध्ये सर्वात कमी वापर आहे

कमी वाहने आणि प्रवासाच्या वेगवेगळ्या पद्धतींमुळे या राज्यांमध्ये पेट्रोलचा वापर कमी आहे. बिहारमध्ये पेट्रोलचा वापर सर्वात कमी असून, तो प्रति 100 लोकांमागे दररोज केवळ 3.3 लिटर आहे. त्यानंतर पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो, जिथे दररोज 5.1 लिटर पेट्रोल वापरले जाते.

भारतातील इंधन वापराची पद्धत काय आहे?

भारतातील इंधन वापराच्या पद्धती राज्यानुसार बदलतात. काही प्रदेशांमध्ये, दरडोई पेट्रोलचा वापर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कित्येक पटींनी जास्त नोंदवला जातो. ही आकडेवारी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्ष (PPAC) या विभागाद्वारे संकलित केली जाते. पीपीएसीच्या २०२४-२५ च्या आकडेवारीनुसार, भारतातील सरासरी दैनंदिन पेट्रोलचा वापर दर १०० लोकांमागे अंदाजे १०.४ लिटर होता. तथापि, एनडीटीव्हीच्या एका अहवालानुसार, राज्यांमधील वितरणात मोठी प्रादेशिक तफावत दिसून येते, जी प्रामुख्याने पर्यटन, शहरीकरण आणि वाहतुकीच्या तीव्रतेमुळे प्रभावित आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget