Petrol Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात (Crude Oil Price) मागील काही दिवसांपासून चढ-उतार सुरू आहेत. नव्या वर्षातही कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. कोरोना महासाथीचे संकट (Coronavirus Pandemic) आणि आर्थिक मंदीची छाया गडद झाल्यास त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या दरावर होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol Diesel Price 1st January 2023) जाहीर केले आहेत. इंधन कंपन्यांनी आजही ग्राहकांना कोणताही दिलासा दिला नाही. पेट्रोल डिझेलचे इंधन दर स्थिर आहेत.
देशात एप्रिल 2022 मध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात झाली होती. त्यावेळी केंद्र सरकारने उत्पादन शु्ल्कात कपात केल्याने ही दर कपात झाली होती. त्यानंतर महाराष्ट्रात राज्य सरकारने जुलै 2022 मध्ये करात केल्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात झाली होती. त्यानंतर देशातील इंधन दर स्थिर आहेत.
कच्च्या तेलाचे दर काय?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वधारले आहेत.ब्रेंट क्रूड ऑइलचा दर 85.91 डॉलर प्रति बॅरल इतका आहे. तर, WTI क्रूड ऑइलचा दर 80.26 डॉलर प्रति बॅरल इतका आहे. काही दिवसांपूर्वी कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली होती. कच्च्या तेलाचा दर हा 75 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास होता.
देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
> दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
> मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
> कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर
> चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर
> नागपूर: पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
> पुणे: पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
> कोल्हापूर: पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
>औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
> परभणी: 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
इतर महत्त्वाच्या बातम्या: