EPFO:  सरत्या वर्षातील शेवटच्या दिवसात EPF पेन्शनधारकांना नवीन वर्षाचे गिफ्ट मिळाले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पेन्शनधारकांना नवीन वर्षापूर्वी मोठी भेट दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ईपीएफओने 29 डिसेंबर रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये दिलेल्या आदेशानंतर EPFO ​​ने काही पेन्शनधारकांना जास्त पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे.


EPFO ​ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, 31 ऑगस्ट 2014 पर्यंत निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांना याचा लाभ दिला जाणार नाही. 1 सप्टेंबर 2014 रोजी किंवा त्यानंतर EPS शी जोडलेल्या लोकांना अधिक पेन्शन मिळण्याचा पर्याय दिला जाणार आहे. यासोबतच नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करताना कोणते कर्मचारी अधिक पेन्शन मिळण्यास पात्र आहेत आणि त्याचा लाभ घेण्यासाठी ते ऑनलाइन अर्ज कसे करू शकतात, हेही सांगण्यात आले आहे. 


कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ज्या कर्मचाऱ्यांनी नोकरीच्या वेळी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेंतर्गत जास्त पगाराचे योगदान दिले आहे आणि सेवानिवृत्तीपूर्वी उच्च निवृत्ती वेतनाचा पर्याय निवडला होता, त्यांना हा लाभ दिला जाणार आहे. EPFO ने म्हटले आहे की ज्या कर्मचाऱ्यांनी EPS मध्ये 5000 रुपये किंवा 6500 रुपयांच्या पगार मर्यादेपेक्षा जास्त पेन्शन मिळवण्यासाठी योगदान दिले आहे तेच या अंतर्गत लाभांसाठी पात्र मानले जातील.


यासह, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने सांगितले की हे अशा कर्मचार्‍यांसाठी देखील आहे, ज्यांनी EPS-95 चे सदस्य असताना जास्त पेन्शनचा पर्याय निवडला होता, परंतु त्यांचा अर्ज EPFO ​​ने नाकारला होता. असे कर्मचारीदेखील वाढीव पेन्शनसाठी पात्र असतील. 


दरम्यान, केंद्र सरकारनं देशभरातील नागरिकांना नव्या वर्षाचं गिफ्ट दिलं आहे. एनएससी, पोस्ट ऑफिसमधील मुदत ठेवी आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनाच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. किसान विकास  पत्र (KIsan Vikas Patra), पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजना ( Post Office Deposit Schemes) एनएससी ( NSC) आणि ज्येष्ठ नागरिकाच्या बचत योजना ( Senior Citizen Saving Schemes) यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: