नवी दिल्ली : इराण-इस्रायल (Iran Israel Conflict) यांच्यातील युद्धजन्य स्थितीमुळे जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या दोन्ही देशांत सध्या तणावाची स्थिती असून त्याचे युद्धात रुपांतर होते की काय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या दोन्ही देशांतील तणावाचा भारतासह जगभरातील अनेक देशांवरही परिमाण पडू शकतो. सध्या भारतात लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे इंदनाचे दर स्थिर आहेत. मात्र इस्रायल-इराण यांच्यातील तणावामुळे इंधनदरावर काय परिणाम पडणार? असे विचारले जात आहे. 


...तर इंधनाचे दर वाढू शकतात


इस्रायल-इराण यांच्यातील संघर्षामुळे भारतातील पेट्रोल, डिझेल, आणि गॅस यावर प्रतिकूल परिणाम पडू शकतो. या दोन देशांतील वाद हा  भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार या दोन्ही देशांतील वाद भविष्यात वाढला तर भारतातील इंधनाचे दरही वाढू शकतात. सध्या दिल्लीमध्ये पेट्रोल 94.72 रुपये लीटर तर डिझेल 87.62 रुपये लीटर असा आहे.


भारतातील इंधनाचे दर का वाढणार? 


इराण-इस्रायल यांच्यातील तणाव वाढत गेल्यास भविष्यात भारतात इंधनाचे दर वाढू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी कारणीभूत ठरू शकते. इस्रायलवर इतर देशांनी दबाव टाकावा यासाठी इस्रायल होर्मुझची सामुद्रधुनी बंद करू शकतो. तसं झाल्यास भारतात इंधनाचे दर वाढू शकतात. कारण भारतासारखे देश सौदी अरेबिया, इराक, यूएई यांच्याकडून याच मार्गान कच्च्या तेलाची आयात करतात. इराणने हा मार्ग बंद केल्यास भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होणार नाही. परिणामी भारतात पेट्रोल, डिझेलचे दर वाढू शकतात. 


तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न


या दोन देशांतील तणामुळे सध्या कच्च्या तेलाचा दर हा 90 अमेरिकी डॉलर्स प्रति बॅलर झाला आहे. जगापुढे इंधन टंचाई आणि दरवाढीचे संकट उभे राहू नये म्हणून हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र इराणने होर्मुझमधून केली जाणारी जलवाहतूक थांबवली तर खनिज तेल तसेच एएनजी यांचे दर वाढतील. 


होर्मुझच्या सामुद्रधुनीला एवढे महत्त्व काय? 


होर्मुझची सामुद्रधुनी अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. हा ओमान आणि इराण दररम्यान 40 किलोमीटरचा जलमार्ग आहे. याच जलमार्गाच्या मदतीने सौदी अरेबिया (63 लाख बॅरल प्रतिदिन), यूएई, कुवैत, कतार, इराक (33 लाख बॅरल प्रतिदिन) आणि ईराण (13 लाख बॅरल प्रतिदिन) कच्या तेलाची निर्यात करतात. जगातील एकूण एलएनजी व्यापराचा साधारणा 20 टक्के व्यापर याच मार्गाने होतो. त्यामुळे ही सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय व्यापराच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. या मार्गावर काही अडथळे निर्माण झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण जगावर पडतो. 


हेही वाचा :


आधी होते LIC एजंट, आज अब्जाधीश, शून्यातून मोठं साम्राज्य उभं करणारे लक्ष्मण मित्तल कोण आहेत?


EPF क्लेम स्टेटस नेमकं कसं चेक करायचं? समजून घ्या सोप्या शब्दांत!


एकही रुपया न देता आधारकार्ड अपडेट करता येणार, नेमकं कसं? जाणून घ्या..