मुंबई : निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांची आर्थिक ओढाताण होऊ नये म्हणून सरकारने ईपीएफओ नावाच्या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून कर्मचारी आपल्या पागारातून निश्चित रक्कम प्रतिमहिन्याला जमा करतात. नंतर हाच निधी तुम्हाला निवृत्तीवेतन म्हणून मिळतो. सरकार तुम्ही जमा केलेल्या रकमेवर निश्चित व्याजदेखील देते. दरम्यान, ईपीएफओमध्ये तुम्ही जमा करत असलेल्या पीएफची नेमकी स्थिती वेळोवेळी जाणून घेतली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे तीन पर्याय उपलब्ध आहेत.
ईपीएफओ पोर्टलवर काय-काय करता येतं
आपल्या खातेदारांच्या सर्व समस्यांचे निरसन व्हावे यासाठी ईपीएफओने एक खास पोर्टल चालू केलेले आहे. या पोर्टलच्या मदतीने खातेदार त्यांच्या पीएफची नेमकी स्थिती जाणून घेऊ शकतात. तसेच त्यांनी पीएफ क्लेम केला असेल, तर त्याची नेमकी स्थितीदेखील खातेधारकांना जाणून घेता येते. याच पोर्टलच्या मदतीने पीएफ खात्याशी संबंधित माहिती, त्यांनी जमा केलेली राशी, जमा केलेल्या रकमेवर सरकारकडून देण्यात येणारे व्याज, नॉमिनी अॅड करणे गोष्टी करता येतात.
तुम्हाला ईपीएफ क्लेम स्टेटस चेक करायचे असेल तर त्यासाठी एकूण तीन पर्याय आहेत. यूएएन मेम्बर पोर्टल, ईपीएफ वेबसाईट आणि उमंग पोर्टलच्या मदतीने तुम्ही तुमचे पीएफ क्लेम स्टेटस जाणून घेऊ शकता.
UAN मेम्बर पोर्टलच्या मदतीने पीएफ क्लेम स्टेटस कसे पाहायचे?
1. यूएएम मेंबर पोर्टलच्या मदतीने तुम्हाला तुमच्या ईपीएफ क्लेमचे स्टेटस पाहायचे असेल तर तुम्हाला अगोदर UAN मेम्बर पोर्टलवर जावे लागेल. तेथे यूएए नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉग ईन करा.
2. पुढे ऑनलाईन सर्व्हिस टॅबवर क्लीक करा
3. ड्रॉप डाऊन करून ट्रॅक क्लेम स्टेटसवर क्लीक करा
4. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन विदड्रॉअल आणि ट्रान्सफर क्लेम स्टेटस चेक करू शकता.
ईपीएफओच्या वेबसाईटवर कसं चेक करणार क्लेम स्टेटस
1. ईपीएफओच्या वेबसाईटवर तुमच्या पीएफ क्लेमचं स्टेटस चेक करायचं असेल तर अघोदर तुम्हाला पुढील लिंकवर क्लीक करावे लागेल. https://passbook.epfindia.gov.in/MemClaimStatusUAN/
2. पुढे तुम्हाला ईपीएफओ पासबुक आणि क्लेम स्टेटस पेजवर क्लीक करावं लागेल.
3. त्यानंतर UAN, ईपीएफओ मेंबर पासवर्ड आणि कॅप्चा टाकावा लागेल.
4. त्यानंतर क्लेम टॅबवर क्लीक केल्यानंतर तुम्ही तुमचे सर्व क्लेम स्टेटस चेक करू शकता.
उमंग अॅपच्या मदतीनेही चेक करता येईल क्लेम स्टेटस
1. सर्वांत अगोदर तुम्हाला उमंग अॅप ओपन करावे लागेल.
2. पुढे EPFO ऑप्शनवर जाऊ All Services सेक्शनवर क्लीक करावे लागेल.
3. त्यानंतर ट्रॅक क्लेम ऑप्शन वर जाऊन ‘Employee Centric Services’ टॅबवर क्लीक करा.
4. त्यानंतर UAN नंबर टाकून ओटीपी ऑप्शनवर क्लीक करा
5. तुम्हाला आलेला ओटीपी टाकून नेक्स्ट या टॅबवर क्लीक करा
6. त्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व क्लेम स्टेटस दिसतील.
हेही वाचा :
उर्जानिर्मिती करणाऱ्या 'या' कंपनीचा शेअर तुम्हाला करू शकतो मालामाल; 'हे' आहे कारण!
सरकारी योजना, फसवणुकीचा धोका नाही, 'या' योजनेत गुंतवल्यास तुम्हाला मिळणार भरघोस परतावा!