SBI Fixed Deposit Interest Rate : जर तुम्ही मुदत ठेव योजना म्हणजे एफडी (FD) करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील सर्वात भारतीय स्टेट बँकेने (SBI) ने ग्राहकांसाठी एक विशेष नवीन ऑफर आणली आहे. SBI बँकेने नवी ठेव योजना सुरू केली आहे. SBI या योजनेवर PPF, NSC आणि पोस्ट ऑफिस बचत योजनांपेक्षा जास्त व्याज देत आहे. SBI कडून ठेवीदारांसाठी खास ऑफर देण्यात येत आहे. ठेवींवर 7.9 टक्के व्याज देण्यात येत आहे. यामुळे ठेवीदारांना भरघोस नफा मिळवण्याची संधी आहे.


SBI FD Interest Rate : मुदत ठेवींवर 7.9 टक्के व्याज


भारतीय स्टेट बँकेने (SBI) सर्वोत्तम मुदत ठेव योजना सुरू केली आहे. या एफडीवर गुंतवणूकदारांना वार्षिक 7.9 टक्के व्याज दिलं जात आहे. ही नॉन-कॉलेबल ठेव योजना आहे. या नवीन मुदत ठेव योजना (FD) योजनेबद्दल जाणून घ्या.


SBI FD Interest Rate : किती गुंतवणूक करू शकता?


SBI सर्वोत्तम मुदत ठेव ही एक विशेष FD योजना आहे. याचा फायदा घेण्यासाठी किरकोळ गुंतवणूकदाराला किमान 15 लाख रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये जास्तीत जास्त दोन कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. यामध्ये बँकेकडून गुंतवणुकीच्या कालावधीसाठी 1 वर्ष आणि 2 वर्ष असे दोन पर्याय दिले जातात. विशेष म्हणजे SBI बेस्ट टर्म डिपॉझिटमध्ये गुंतवणूकदारांना नूतनीकरणाचा पर्याय दिला जात नाही आणि मॅच्युरिटीवर रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा केली जाते.


SBI FD Interest Rate : एसबीआयची सर्वोत्तम मुदत ठेव योजना


सध्या बहुतांश बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जास्तीत जास्त व्याज देत असल्याने एसबीआयनेही ही खास योजना आणली आहे. एसबीआयच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, एका वर्षाच्या ईपीडीवर सर्वोत्तम योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के. व्याज मिळेल. त्याच वेळी, या योजनेअंतर्गत, एका वर्षाच्या एफडीवर 7.1 टक्के व्याज मिळेल.


SBI FD Interest Rate : भरघोस नफा मिळवण्याची संधी


देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांसाठी एक विशेष नवीन ठेव योजना सुरू केली आहे. PPF, NSC आणि पोस्ट ऑफिस बचत योजनांच्या तुलनेत SBI या योजनेवर जास्त व्याज देत आहे. SBI सर्वोत्तम नावाच्या या योजनेत ग्राहकांना 2 वर्षांच्या ठेवीवर म्हणजेच FD वर सर्वसामान्यांसाठी 7.4 टक्के व्याजदर आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना या योजनेवर 7.9 टक्के व्याज मिळत आहे. तसेच या एफडीमध्ये ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी, कर्मचारी ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजदरही दिला जात आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Gold Hallmarking : 1 एप्रिलपासून सोने खरेदीच्या नियमात मोठा बदल, आता सहा अंकी हॉलमार्क असलेले दागिनेच ठरणार वैध