Salary Hikes in 2023 : कर्मचारी वर्गासाठी खूशखबर आहे. 2023 वर्षात कर्मचाऱ्यांना बंपर वेतनवाढ (Salary Hike) मिळण्याची शक्यता आहे. एका सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, यंदाच्या वर्षात कर्मचाऱ्यांना मोठी पगार वाढ मिळू शकते. 2023 मध्ये आर्थिक आव्हानं असूनही कंपन्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याची तयारीत आहेत. पगारवाढ डबल डिजिटने वाढण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, कर्मचाऱ्यांना 2023 मध्ये सरासरी 10.3 टक्क्यांनी पगार वाढण्याची शक्यता आहे. ही कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि चांगली बातमी आहे.


कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर वेतनवाढ


जागतिक व्यावसायिक सेवा कंपनी एऑन हेविथ ग्लोबल्स (Aon Hewitt Globals) ने पगारवाढीसंदर्भात एक नवीन सर्वेक्षणाचा अहवाल जारी केला आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, 2022 मध्ये सरासरी पगारात 10.6 टक्क्यांनी वाढ झाली. यंदाच्या म्हणजे चालू 2023 वर्षात जागतिक मंदीचं सावट आणि आर्थिक अस्थिरता असूनही कंपन्या बंपर पगारवाढ देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. कंपन्यांकडून 2023 मध्ये 10.3 टक्क्यांनी पगार वाढवणार असल्याचं अंदाज या रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आला आहे.


सर्वेक्षणात समोर आली 'ही' माहिती


एऑन हेविथ ग्लोबल्स कंपनीने 40 उद्योगांमधील 1400 कंपन्यांचे सर्वेक्षण करून त्यावरून हा रिपोर्ट काढला आहे. त्यापैकी 46 टक्के कंपन्या 2023 मध्ये पगार दुहेरी अंकानी पगार वाढवण्याच्या तयारीत आहेत. गेल्या वर्षी पगारात 10.6 टक्क्यांनी वाढ झाली होती. 2020 आणि 2021 च्या कोरोना महामारीमुळे कंपन्यांनी वेतनवाढ दिली नाही. त्यानंतर 2022 मध्ये चांगली पगारवाढ देण्यात आली. त्यानंतर हे वर्षही कर्मचाऱ्यांसाठी सुखाचं जाणार आहे.


'या' क्षेत्रातही मिळेल चांगली पगारवाढ


या रिपोर्टनुसार, तंत्रज्ञान आणि उत्पादनांशी संबंधित कंपन्याकडून 2023 मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यात येणार आहे. या क्षेत्रातील पगार सरासरी 10.9 टक्क्यांनी वाढतील. अलीकडेच विप्रोने फ्रेशर्सना दिलेली पगाराची ऑफर कमी केल्यावर हा रिपोर्च समोर आला आहे. घरी बसण्यापेक्षा कमी पगारात काम करण्याची ऑफर विप्रो कंपनीने फ्रेशर्सना दिली. कंपनीने वार्षिक ऑफर 6.5 लाख रुपयांवरून 3.5 लाख रुपये करण्यात आली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Inflation : 'महंगाई डायन...'; जानेवारी महिन्यात महागाईचा झटका, किरकोळ महागाईचा दर वाढला