Consumer Price Index : 'महंगाई डायन खाये जात हैं...' नवीन वर्षातही नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. जानेवारी 2023 मध्ये महागाईचा दर (Retail Inflation Rate) वाढला आहे. सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. खाद्यपदार्थ आणि इंधन तसेच इतर वस्तू आणि सेवाही महागल्या आहेत. जानेवारी 2023 मध्ये किरकोळ महागाईचा दर पुन्हा एकदा केवळ 6 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. जानेवारी 2023 मध्ये, किरकोळ महागाई दरात मोठी वाड झाली असून हा दर 6.52 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर डिसेंबर 2022 मध्ये किरकोळ महागाई दर 5.72 टक्के होता. जानेवारी 2022 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 6.01 टक्के होता.
महागाई वाढण्याची कारणं
किरकोळ महागाई वाढण्याची विविध कारणे आहेत. जानेवारी 2023 मध्ये खाद्यपदार्थांचा महागाई दर 5.94 टक्क्यांवर पोहोचला आहे. डिसेंबर 2022 मध्ये महागाईचा दर 4.19 टक्के होता. जानेवारीत खाद्यपदार्थ महाग झाले आहेत. जानेवारी 2022 मध्ये खाद्यपदार्थांचा महागाई दर 5.43 टक्के होता. जानेवारी 2023 मध्ये दुधाचे दर वाढले असून त्याचा परिणाम किरकोळ महागाई दरावर दिसून येत आहे.
खाद्यपदार्थांवरील किरकोळ महागाईचा दर
दूध आणि दुधापासून बनवलेल्या उत्पादनांचा महागाई दर 8.79 टक्के आहे. मसालेही महागले आहेत आणि मसाल्यांचा महागाईचा दर 21.09 टक्के आहे. तृणधान्ये आणि उत्पादनांचा महागाई दर 16.12 टक्के आहे. मांस आणि माशांच्या महागाईचा दर 6.04 टक्के आहे, तर अंडीही महागली असून त्याच्या महागाईचा दर 8.78 टक्के आहे. पालेभाज्या आणि भाज्यांचा महागाई दर घटला असून तो -11.70 टक्के आहे. फळांचा भाव 2.93 टक्के होता. डाळींच्या महागाईचा दर 4.27 टक्के आहे.
सर्वसामान्यांना महागाईचा फटका
देशभरात सर्वसामान्यांना सर्वत्र महागाईचा फटका बसत आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होत नाहीत, तर दुसरीकडे दैनंदिन वापरातील वस्तूही महाग होत आहेत. दूध, साबण, टूथपेस्ट यांसारख्या दैनंदिन जीवनाशी निगडीत वस्तूंची किंमतही वाढताना दिसत आहे. जानेवारी 2022 मध्ये या वस्तूंच्या किमती तीन ते 20 टक्क्यांनी वाढल्या होत्या. त्यानंतर कच्च्या मालाच्या किमतीत ही दरवाढ वाढ झाल्याचं सांगण्यात आलं.
एका वर्षात पिठाचे दर 40 टक्क्यांनी वाढले
भारतात गव्हाच्या पिठाची किंमतही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रिपोर्टनुसार, भारतात गेल्या एका वर्षामध्ये पिठाची किंमत 40 टक्क्यांनी वाढली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, सुटे पीठ 38 रुपये प्रतिकिलो रुपयाने विकले जात आहे, तर पॅकेजिंगमधील पीठ 45-55 रुपये प्रतिकिलो आहे. निर्यातीवर बंदी असतानाही गहू आणि पिठाच्या वाढत्या किमतींमुळे केंद्र सरकारवर तणाव वाढला आहे. याशिवाय फक्त गहूचं नाही तर, दुधाच्या दरातही वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Inflation : चोर पावलांनी आली महागाई; सामान्यांचे कोलमडले बजेट, वस्तूंचे वजन घटले पण किंमती वाढल्या