Post Office PPF Scheme: जर तुमचे वय 20 वर्ष असेल आणि तुम्हाला वयाच्या 40 वर्षापर्यंत तुमच्या खात्यात 40 लाख रुपये जमा करायचे असतील, तर पोस्ट ऑफिसची (Post Office) PPF योजना खूप उपयुक्त ठरू शकते. कारण पीपीएफ गुंतवणुकीसाठी (PPF Investment) अत्यंत सुरक्षित मानली जाते. तसेच पीपीएफमध्ये (PPF) गुंतवणूक (Investment Tips) केल्यास खात्रीशीर परतावा मिळतो. सोप्या भाषेत समजवायचं झालं तर पीपीएफ योजनेत (PPF Scheme) जोखीम कमी आणि नफा अधिक होईल. विशेष बाब म्हणजे, या योजनेत करसवलत मिळते, त्यासोबतच या योजनेवर मिळणाऱ्या व्याजदरात (Interest Rates) तिमाहीत बदल केला जातो.


Post Office PPF Scheme



  • प्रति वर्ष गुंतवणूक: 1 लाख रुपये 

  • कार्यकाळ: 20 वर्षे 

  • व्याजदर: 7.1 टक्के 

  • गुंतवलेली एकूण रक्कम : 20 लाख रुपये 

  • एकूण व्याज मिळाले : 24,38,859 रुपये

  • मॅच्युरिटी रक्कम : 44,38,859 रुपये


पोस्ट ऑफिस PPF स्कीम (Post Office PPF Scheme)                                                                    


PPF योजनेतील गुंतवणूक पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेतून सुरू करता येते. तुम्ही एका आर्थिक वर्षात योजनेत किमान 500 रुपये जमा करू शकता. तर जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करता येतील. गुंतवणूकदार 50 रुपयांच्या गुंतवणुकीनं गुंतवणूक सुरू करू शकतात. कलम 80C अंतर्गत गुंतवणुकीच्या रकमेवरही कर कपात उपलब्ध आहे. आयटी कायद्यानुसार, व्याजाची रक्कम करमुक्त आहे. 


PPF वर EEE कर सवलतीचा लाभ 


PPF कराच्या EEE श्रेणीत येतो. म्हणजेच, योजनेत गुंतवलेल्या संपूर्ण रकमेवर कर सूट (Tax Concessions) मिळेल. याशिवाय त्या गुंतवणुकीवर मिळणारं व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी संपूर्ण रक्कमही करमुक्त आहे. म्हणूनच पीपीएफ गुंतवणूक दीर्घकालीन फायद्यांच्या दृष्टीनं चांगली मानली जाते.


5 वर्षांचा लॉक इन कालावधी


प्री-विड्रॉवलसाठी, PPF खात्यातील लॉक-इन कालावधी 5 वर्षांसाठी ठेवण्यात आला आहे. म्हणजेच, खातं उघडल्याच्या वर्षानंतर 5 वर्षांपर्यंत या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, फॉर्म 2 भरून प्री-विड्रॉवल करता येईल. दरम्यान, 15 वर्षांपूर्वी मॅच्युरिटी काढता येत नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Types Of Provident Fund : EPF, PPF आणि GPF म्हणजे काय? कुठल्या गुंतवणुकीत किती परतावा?