NPS Withdrawal Rules : राष्ट्रीय पेन्शन योजनेमधून (NPS) पैसे काढण्याचे नियम आता बदलणार आहेत. राष्ट्रीय पेन्शन योजनेसंदर्भातील नियम (Rule Change) लवकरच बदलणार आहेत. राष्ट्रीय पेन्शन योजनेमधून (NPS) पैसे काढण्याचे नियम 1 फेब्रुवारी 2024 पासून बदलतील. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने हा नियम बदलला आहे. पीएफआरडीएने (PFRDA) याबाबत अधिसूचना जारी केली आहे. नव्याने जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, 1 फेब्रुवारी 2024 पासून, खातेदाराला जमा रकमेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी दिली जाणार नाही. पुढील महिन्यापासून हा नियम लागू होणार आहे. सध्या या नियमाची अंमलबजावणी झालेली नाही. 1 फेब्रुवारी 2024 पासून हा नवीन नियम लागू होईल.


तुम्ही NPS खात्यातून पैसे कधी काढू शकता?



  • नॅशनल पेन्शन सिस्टीम (National Pension Scheme) अंतर्गत काही विशिष्ट परिस्थितीत तुम्हाला खात्यातून (NPS Account) पैसे काढण्याची (NPS Account Withrown Rule) सुविधा मिळते. कोणत्या परिस्थितीत तुम्ही NPS खात्यातून पैसे काढू शकता.

  • NPS खातेदार घर खरेदी (Buying House) करण्यासाठी NPS खात्यातून पैसे काढू शकतात.

  • NPS खातेदार मुलांच्या शिक्षणासाठी (Childerns Education) किंवा लग्नासाठी (Marriage) पैसे काढण्यासाठी अर्ज करू शकतात.

  • मेडिकल इमर्जन्सी (Medical Emergency) असली तरी NPS खात्यातून पैसे काढता येतात.

  • नवीन व्यवसाय (Business) किंवा स्टार्टअप (Start Up) सुरू करण्यासाठी पैसे काढण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

  • अपंगत्वामुळे अचानक होणारा खर्च भागवण्यासाठी खातेदार पैसे काढू शकत असल्यास.

  • कौशल्य विकास (Skill Development) खर्चासाठी तुम्ही खात्यातून पैसेही काढू शकता.


NPS खात्यातून पैसे काढण्यासंदर्भात 'या' आहेत अटी



  • NPS खाते 3 वर्षे जुने असेल तरच खात्यातून पैसे काढता येतील.

  • तुम्ही NPS खात्यातील एकूण ठेव रकमेच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त रक्कम काढू शकत नाही.

  • खातेदार फक्त 3 वेळा पैसे काढू शकतो.

  • NPS खात्यातून पैसे कसे काढायचे

  • NPS खात्यातून पैसे काढण्यासाठी, पैसे काढण्याची विनंती दाखल करावी लागेल.

  • खातेदाराला पैसे काढण्याचे कारण द्यावे लागेल. याशिवाय त्यांना काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

  • पैसे काढण्याची विनंती सबमिट केल्यानंतर, सेंट्रल रेकॉर्डकीपिंग एजन्सी या अर्जावर प्रक्रिया करते.

  • पैसे काढण्याच्या विनंतीवर प्रक्रिया केल्यानंतर काही दिवसांनी खात्यात पैसे जमा होतात.


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


NPS : एनपीएस खातं कसं उघडायचं? स्टेप-बाय-स्टेप ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया जाणून घ्या