NPS Account Opening Process : राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension System) ही सरकारी योजना असल्यामुळे अलिकेड बहुतेक लोक याकडे वळताना दिसत आहेत. नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये (NPS) गुंतवणूक करुन तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतरचे चांगले नियोजन करु शकता. यामध्ये तुम्ही रिटायरमेंट फंड आणि पेन्शन या दोन्हींचा पर्याय निवडू शकता. राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक करुन तुम्ही निवृत्तीसाठी चांगला निधी जमा करू शकता. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर भरण्यातही सवलत मिळते. राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension System) मध्ये तुम्हाला 2,00,000 रुपयांपर्यंत कर सवलत मिळू शकते.


How to Open NPS Account : एनपीएस खातं कसं उघडायचं?


एनपीएस (NPS) खातं म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension System) साठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने खातं सुरु करु शकता.


ऑनलाईन NPS खातं उघडण्याची प्रक्रिया काय?



  • ऑनलाईन NPS खातं उघडण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी सीआरएच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. 

  • तुम्ही CAMS, KFin Technologies आणि Protean eGov Technologies या तीनपैकी एका सीआरए वेबसाईटवर जाऊन एनपीएस खातं उघडू शकता.

  • सर्वात आधी तुम्हाला मोबाईल नंबर, पॅन कार्ड नंबर, ई-मेल आयडी प्रविष्ट करून नोंदणी करावी लागेल.

  • यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ओटीपी येईल, तो प्रविष्ट करा.

  • यानंतर PRAN नंबर तुम्हाला मोबाईल आणि ई-मेलवर मिळेल. अशाप्रकारे तुमचं एनपीएस अकाऊंट सुरु झालं आहे.


ऑफलाईन NPS अकाउंट सुरु करण्यासाठी काय करावं?



  • ऑफलाइन NPS खाते उघडण्यासाठी, तुम्हाला तुमचा जवळचा पॉइंट ऑफ प्रेझेन्स (PoP) केंद्र शोधावं लागेल. ही बँका, पोस्ट ऑफिस आणि सरकारी कार्यालये असू शकतात. 

  • पीएफआरडीएच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही पीओपीची यादी मिळवू शकता. तुम्हाला पीओपी केंद्रावर जाऊन केवायसी करावं लागेल. 

  • यानंतर, तुम्ही NPS टियर 1 खात्यात 500 रुपये जमा करून खातं उघडू शकता.

  • NPS अंतर्गत जमा केलेले फंड इक्विटी आणि डेटमध्‍ये गुंतवले जातात, यामुळे गुंतवणूकदारांना कमी जोखमीसह चांगला परतावा देता येईल. 


कर भरताना मिळेल सूट


तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मध्ये गुंतवणूक करून कर वाचवू शकता. राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला प्राप्तिकर भरताना सवलत मिळवता येईल आयकराच्या कलम 80CCD(1) अंतर्गत 1.5 रुपये लाख आणि कलम 80CCD(2) अंतर्गत 50 हजार रुपयांची कर सूट उपलब्ध आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ram Mandir Prasad : अयोध्यातील राम मंदिराच्या नावाने बनावट प्रसादाची ऑनलाईन विक्री, ॲमेझॉनला केंद्राची नोटीस