(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIC Policy : एक लाख रुपये पेन्शन! फक्त एकदाच करावं लागेल 'हे' काम, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल माहिती आहे का?
LIC New Jeevan Shanti Plan : एलआयसीच्या नवीन जीवन शांती योजनेमध्ये कोणतीही व्यक्ती पैसे गुंतवू शकते. तुम्ही ही योजनामधेच थांबवूही शकता. शिवाय यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी मर्यादाही नाही.
LIC New Jeevan Shanti Plan : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी एकापेक्षा एक अनेक उत्तम योजना आहेत. एलआयसीच्या पेन्शन योजना (LIC Pension Policy) ही फार लोकप्रिय आहेत. यामुळे तुम्हाला निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता मिळते. एलआयसी न्यू जीवन शांती योजना, ही एकल प्रीमियम योजना आहे. यामध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक केली की, तुम्हाला दरवर्षी 50,000 रुपये पेन्शन मिळू शकते. या योजनेबाबत सविस्तर जाणून घ्या.
एकदा गुंतवणूक करा, आयुष्यभर पेन्शन मिळवा
एलआयसीच्या नवीन जीवन शांती योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. एकदा तुम्ही गुंतवणुक केल्यानंतर निवृत्त झाल्यावर ही पॉलिसी तुम्हाला नियमित पेन्शनची हमी देते. या योजनेमध्ये केलेल्या एका गुंतवणुकीनंतर तुम्हाला निवृत्तीनंतर आयुष्यभर पेन्शन मिळत राहते.
वयोमर्यादा 30-79 वर्षे
एलआयसीची ही पॉलिसी घेण्यासाठी वयोमर्यादा 30 ते 79 वर्षे आहे. महत्त्वाचं म्हणजे, या योजनेत कोणतीही जोखीम नाही. पण, याचे फायदे खूप आहेत. ही एलआयसी योजना खरेदी करण्यासाठी दोन पर्याय देण्यात आले आहेत. यापैकी पहिली योजना एकल जीवनासाठी स्थगित वार्षिकी आहे आणि दुसरी योजना संयुक्त जीवनासाठी स्थगित वार्षिकी आहे. म्हणजे, तुमची इच्छा असल्यास, तुम्ही एकाच योजनेत गुंतवणूक करू शकता किंवा तुम्ही एकत्रित पर्याय निवडू शकता.
एक लाख रुपये पेन्शन मिळवण्याची संधी
LIC ची नवीन जीवन शांती योजना ही एक वार्षिक योजना आहे आणि ती खरेदी करण्यासोबतच, तुम्ही त्यात तुमची पेन्शन मर्यादा निश्चित करून मिळवू शकता. यामुळे निवृत्तीनंतर तुम्हाला आयुष्यभर निश्चित पेन्शन मिळत राहील. ही योजना उत्कृष्ट व्याज देते. त्याशिवाय या योजनेवर अवलंबून, जर 55 वर्षांच्या व्यक्तीने हा प्लॅन खरेदी करताना 11 लाख रुपये जमा केले आणि ते पाच वर्षांसाठी ठेवले, तर या एकरकमी गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक 1,01,880 रुपये मिळू शकतात. सहा महिन्यांच्या आधारावर मिळणारी पेन्शनची रक्कम 49,911 रुपये असेल आणि मासिक आधारावर पेन्शन 8,149 रुपये असेल.
तुम्ही पॉलिसी कधीही सरेंडर करू शकता
एलआयसीने नवीन जीवन शांती योजनेसाठी वार्षिकी दर वाढवले आहेत. LIC ने 5 जानेवारी 2023 पासून वार्षिकी दर वाढवले आहेत. या योजनेत कोणीत्याही व्यक्तीला गुंतवणूक करता येते. विशेष म्हणजे तुम्ही हा प्लॅन कधीही सरेंडर करू शकता आणि त्यात किमान 1.5 लाख रुपये गुंतवू शकता, तर यासाठी कमाल मर्यादा नाही. या कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या खात्यात जमा केलेली संपूर्ण रक्कम नॉमिनीला दिली जाते.