Paisa Jhala Motha : "विम्याच्या हप्त्यांच्या रकमेमध्ये वाढ होत असेल आणि दुसरी एखादी कंपनी तेवढ्याच रक्कमेत वैद्यकीय विमा देत असेल तर आधीच्या कंपनीतून दुसऱ्या कंपनीत विमा पोर्ट करता येतो. किंवा एखाद्या कंपनीकडून सेवा व्यवस्थेत मिळत नसेल तर ग्राहक आपली पॉलिसी पोर्ट करतात. याशिवाय काही नवीन आलेल्या कंपन्या वैद्यकीय विम्यासह आणखी वाढिव सुविधा देत असतात. त्यामुळे ग्राहक आपला विमा पोर्ट करतात, अशी माहिती जनरल इन्शुरन्स तज्ज्ञ सचिन शेडगे (Sachin Shedge ) यांनी दिली. एबीपी माझाच्या ( ABP majha ) 'पैसा झाला मोठा' (Paisa Jhala Motha) या कार्यक्रमात सचिन शेगडे बोलत होते.
गेल्या दोष- अडीच वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. अशा परिस्थित वैद्यकीय विम्याचे महत्व पुढे आले आहे. याच पार्श्वभूमीवर एबीपी माझाच्या पैसा झाला मोठा या कार्यक्रमात सचिन शेडगे यांनी विमा पोर्ट कसा करावा यासह वैद्यकीय विमा किती महत्वाचा आहे, याबाबत माहिती दिली.
"आधीच्या कंपनीतून दुसऱ्या कंपनीत विमा पोर्ट केला तर तुम्हाला आधीच्या विम्यातील फायदे जसेच्या तसे मिळतात. वैद्यकीय विमा हा दुसऱ्या कंपनीत जसाच्या तसा पोर्ट करणं शक्य आहे. विमा पोर्टींग प्रक्रिया किमान 45 दिवस आधी करणे गरजेचं आहे. शिवाय सध्याची वैद्यकीय माहिती नवीन विमा कंपनीला देणं गरजेचं आहे. कारण एखाद्या विमा धारकाला एखादा आजार असेल किंवा पहिल्या कंपनीचे काही नियम असतील तर त्यासाठी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या 45 दिवसांचा कालावधी खूप महत्वाचा आहे. अचानक विमा पोर्ट केला तर विमा धारकाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, याशाठी हा कालावधी खूप महत्वाचा आहे. आपण विमा घेत असताना या विम्यातून कोणत्या गोष्टी मिळणार नाहीत, याबाबत कंपनीला विचारणा करावी असे शेडगे सांगतात.
सचिन शेडगे सांगतात, "विमा पॉलिसीधारक हा 24 तासांपेक्षा जास्त वेळ रूग्णालयात दाखल असेल तर तुम्हाला विमा पॉलिसीचे फायदे मिळतात. शिवाय क्लेम रिजेक्ट झाला तर इन्शुरन्स कंपनीच्या ग्रव्हीएन विभागात तुम्ही क्लेम रिजेक्ट झाल्याबद्दल माहिती देणे गरजेचे आहे. येथे माहिती देऊनही पुन्हा कंपनीने क्लेम रिजेक्ट केला तर ग्राहकांनी कंपनीच्या इन्शुरन्स अंबजमेनमध्ये जावून आपली तक्रार करायची आहे. या ठिकाणी कंपनी आणि पॉलिसीधारकांना समोरासमोर बसून अडचण सोडवली जाते."
"एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत विमा पोर्ट करत असताना मागील तीन ते चार वर्षांमधील विमा कागदपत्रे नवीन कंपनीत जमा करा. शिवाय तुमच्या आजारांबाबतची संपूर्ण माहिती दुसऱ्या द्यावी लागते, अशी माहिती सचिन शेडगे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या