Investment Plan : सध्या तुम्हाला गुंतवणूक (Investment) करण्यासाठी विविध मार्ग आहेत. मात्र, गुंतवणूक करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. यामध्ये आपण ठेवलेली ठेव सुरक्षीत आहे का? आणि त्यावर परतावा किती मिळतो? या गोष्टी महत्वाच्या आहेत. दरम्यान, गुंतवणूक करताना तुम्ही 50-30-20 नियम वापरु शकता. या नियमाच्या आधारे जर तुम्ही बचत केली तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो, जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 


अनेक नोकरदार लोकांना गुंतवणूक करण्याची इच्छा असते. मात्र, पैशांचे योग्य नियोजन न केल्यामुळं त्यांची गुंतवणूक होऊ शकत नाही. आलेला पगार नेमका कुठं जातो हेच त्यांना समजत नाही. अशा लोकांनी 50-30-20 या नियमाचा वापर करावा. या नियमांमुळं तुमचे आर्थिक नियोजन सुधारु शकता. नेमका काय आहे  50-30-20 नियम याबाबत माहिती पाहुयात. 


पगाराची तीन भागात विभागानी 


एलिझाबेथ वॉरन यांनी 50-30-20 हा नियम सुरु केला आहे. यूएस सिनेट आणि टाइम मॅगझिनच्या 100 प्रभावशाली व्यक्तिंच्या यादीत देखील एलिझाबेथ वॉरन यांचा समावेश होता. एलिझाबेथ वॉरन यांनी पगाराच्या संदर्भात महत्वाची माहिती दिली होती. यामध्ये त्यांनी पगाराची तीन भागात विभागानी केली होती. यामध्ये गरज, इच्छा आणि बचत यांचा समावेश आहे. एलिझाबेथ वॉरन यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या उत्पन्नातील 50 टक्के भाग हा अशा गोष्टींवर खर्च करा की, ज्या गोष्टी आवश्यक आहेत. यामध्ये  घरातील रेशन, भाडे, मुलांचे शिक्षण, ईएमआय , आरोग्य विमा यासारख्या गोष्टींवर तुम्ही 50 टक्के खर्च करा. 


30 टक्के इच्छांवर अवलंबून 


दरम्यान, या नियमाचा दुसरा भाग म्हणजे 30 टक्के. हा खर्च एखाद्याच्या इच्छावर खर्च केला पाहिजे. हे असे खर्च आहेत की, जे टाळले जाऊ शकतात. परंतू या गोष्टींवर पैसे खर्च केल्यानं लोकांना आनंद मिळतो. यामध्ये चित्रपट पाहणे, पार्लरला जाणे, खरेदी करणं, बाहेर खाणे यावर खर्च होतो.  


नियमानुसार हा 20 टक्के भाग बचतीसाठी ठेवावा


दरम्यान, नियमातील तिसरा आणि महत्वाचा टप्पा म्हणजे 20 टक्के भाग. नियमानुसार हा 20 टक्के भाग बचतीसाठी ठेवावा. हे पैसे तुमच्या निवृत्तीचे नियोजन, मुलांचे उच्च शिक्षण, मुलांचे लग्न आणि आपत्कालीन निधीसाठी वापरले जाऊ शकतात. 20 टक्के बचत होणं गरजेचंच आहे. या नियमानुसार तुम्ही गेल्यात तर तुमची मोठी बचत होऊ शकते. 


50  हजार रुपये पगार असेल तर कसे कराल नियोजन?


समजा तुम्हाला जर महिन्याला 50  हजार रुपये पगार असेल तर तुम्ही 50-30-20 चा नियम कसा वापराल. यामध्ये तुम्ही 25 हजार रुपये आवश्यक त्या गोष्टींसाठी वापरा. तर पगारातील 30 टक्के पैसे म्हणजे 15 हजार रुपये म्हण हे तुमच्या इच्छेनुसार खर्च करु शकता. यामध्ये तुम्ही प्रवास करणे, चित्रपट पाहणे, कपडे यावर खर्च करु शकता. तर उरलेले 20 टक्के म्हणजे तुम्ही 10 हजार रुपये बचत करु शकता. या पैशांची तुम्ही वेगळ्या पद्धतीने गुंतवणूक करु शकता. FD करु शकता, किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करु शकता. 


महत्वाच्या बातम्या:


कमी गुंतवणूक, फायदा अधिक! 45 रुपयांची गुंतवणूक करा 25 लाख मिळवा