Celebrities on Mother's Day 2024 : जगातील कोणत्याही गोष्टीसमोर आईचं प्रेम सगळ्यात पुढे आहे. आईबद्दल बोलणं शब्दात मांडणं कठीण आहे. आईबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यासाठी मातृदिन साजरा केला जातो. मातृदिन दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यंदाचा मातृदिन आज म्हणजेच 12 मे 2024 रोजी साजरा केला जात आहे. दुसरीकडे अनेक स्टारकिड्स आपल्या आईसोबत पहिल्यांदाच 'मदर्स डे' (Mother's Day) साजरा करणार आहेत. या यादीत अनुष्का शर्माचा मुलगा अकायसह इशिता दत्तचा मुलगा वायुपर्यंत अनेकांचा समावेश आहे. 


अनुष्का शर्मा - अकाय


विराट-अनुष्काने काही दिवसांपूर्वी आपला दुसरा मुलगा अकायचं स्वागत केलं आहे. वामिकानंतर 15 फेब्रुवारी 2024 रोजी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. चाहत्यांनी अद्याप अकायची झलक पाहिलेली नाही. 


इशिता दत्ता - वायु


'दृश्यम' फेम अभिनेत्री इशिता दत्त आणि वत्सल सेठ 19 जुलै 2023 रोजी आई-बाबा झाले आहेत. आपल्या पहिल्या मुलाच्या जन्माची बातमी इशिका-वत्सलने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना दिली होती. जोडप्याने आपल्या मुलाचं नाव वायु असं ठेवलं आहे.


दीपिका कक्कड - रुहान


दीपिका कक्कडने 2023 च्या जून महिन्यात रुहानला जन्म दिला आहे. यावर्षी दीपिका पादुकोण आपल्या मुलासोबत पहिला मदर्स डे साजरा करण्यासाठी सज्ज आहे.


दिशा परमार - नव्या


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिशा परमारने सप्टेंबरमध्ये नव्याला जन्म दिला आहे. नव्या आता 8 महिन्यांची झाली आहे. त्यामुळे नव्याचादेखील हा पहिलाच मदर्स डे आहे.


रुबीना दिलैक - जीवा आणि एधा


छोट्या पडद्यावरील लाडकी सून अर्थात रुबीना दिलैकने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. अभिनेत्रीने आपल्या जुळ्या मुलांची नावे जीवा आणि एधा अशी ठेवली आहेत. यावर्षी रुबिना आपल्या मुलांसोबत पहिल्यांदाच मातृदिन साजरा करणार आहे.


मातृदिनानिमित्त आईसोबत 'हे' चित्रपट नक्की पाहा (Mother's Day Movies)


1. मॉम - अभिनेत्री श्रीदेवीचा मॉम हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहता येईल.


2. मिमी - कृती सेननचा मिमी हा चित्रपट प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येईल.


3. इंग्लिश विंग्लिश - श्रीदेवीचा इंग्लिश विंग्लिश चित्रपट प्रेक्षकांना प्राईम व्हिडीओवर पाहता येईल.


4. बधाई हो - बधाई हो हा विनोदी चित्रपट प्रेक्षकांना डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.


5. निल बट्टे सन्नाटा - निल बट्टे सन्नाटा हा चित्रपट प्रेक्षक प्राईम व्हिडीओवर पाहू शकतात. 


6. डार्लिंग्स - आलिया भट्टचा डार्लिंग्स चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहता येईल. 


संबंधित बातम्या


Mother's Day 2024 : नरगिस, रीमा लागू ते अनुष्का शेट्टी; 'या' अभिनेत्रींनी गाजवली आईची भूमिका