Investment Plan : तुम्ही जर तुमच्याजवळ असलेल्या पैशांचं योग्य नियोजन केलं तर तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. अनेक चांगल्या योजना आहेत, यामध्ये तुम्हाला कमी गुंतवणुकीत (Investment) अधिक फायदा मिळतो. एलआयसीची अशीच एक सुपरहीट योजना आहे. जीवन आनंद पॉलिसी (jeevan anand policy scheme) असं या योजनेचं नाव आहे. यामध्ये 1 लाख रुपयांची विमा रक्कम दिली जाते. तर कमाल मर्यादा नाही. पॉलिसी पूर्ण होईपर्यंत तुम्ही या योजनेत प्रिमीयम भरु शकता. 


जीवन आनंद पॉलिसी ही योजना सर्व स्तरातील व्यक्तिंसाठी फायद्याची ठरते. कोणत्याही वयाचा व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेत लोकांना सुरक्षा आणि चांगला परतावा या दोन्ही गोष्टी मिळतात. या योजनेत तुम्ही दररोज फक्त 45 रुपयांची गुंतवणूक करुन 25 लाख रुपये मिळवू शकता. कमी प्रिमीयममध्ये जर तुम्हाला चांगला नफा मिळवायचा असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणू करु शकता. 


पॉलिसी पूर्ण होईपर्यंत तुम्ही या योजनेत प्रीमियम भरु शकता


पॉलिसी पूर्ण होईपर्यंत तुम्ही या योजनेत प्रीमियम भरु शकता. या पॉलिसीमध्ये तुम्हाला एका योजनेअंतर्गत अनेक मॅच्युरिटी लाभ मिळू शकतात. तर जीवन आनंद पॉलिसीमध्ये 1 लाख रुपयांची विमा रक्कम दिली जाते. या योजनेत तुम्ही 45 रुपये जमा करून 25 लाख रुपये मिळवू शकता. 


कसे मिळतील 25  लाख रुपये 


जीवन आनंद पॉलिसीमध्ये तुम्ही दररोज सुमारे 45 रुपये वाचवू शकता.  एका महिन्यात 1358 रुपये जमा करुन  तुम्ही 25 लाख रुपये मिळवू शकता. तुम्हाला ही रक्कम दीर्घ मुदतीसाठी दरमहा जमा करावी लागेल. त्याची पॉलिसी टर्म 15 ते 35 वर्षे आहे. म्हणजेच जर तुम्ही या पॉलिसी अंतर्गत दररोज 45 रुपयांची बचत करून 35 वर्षांसाठी गुंतवणूक केली, तर या पॉलिसीची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर तुम्हाला 25 लाख रुपये मिळतील. जर आपण वार्षिक आधारावर बचत केलेली रक्कम पाहिली तर ती सुमारे 16,300 रुपये असणार आहे. 


दरमहा 1358 रुपये गुंतवल्यास, एका वर्षात 16,300 रुपये जमा


तुम्ही दरमहा 1358 रुपये गुंतवल्यास, एका वर्षात 16,300 रुपये जमा होतील. अशा प्रकारे, 35 वर्षांमध्ये गुंतवलेली एकूण रक्कम 5,70,500 रुपये होईल. जर तुम्ही 35 वर्षांसाठी गुंतवणूक केली, तर तुमची विम्याची रक्कम रु. 5 लाख असेल, ज्यामध्ये मॅच्युरिटी कालावधीनंतर, तुम्हाला 8.60 लाख रुपयांचा रिव्हिजनरी बोनस आणि 11.50 लाख रुपयांचा अंतिम बोनस दिला जाईल. LIC च्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये दोनदा बोनस दिला जातो, परंतु यासाठी तुमची पॉलिसी 15 वर्षांची असणे आवश्यक आहे. दरम्यान, जीवन आनंद पॉलिसी घेणाऱ्या पॉलिसीधारकाला या योजनेंतर्गत कोणत्याही कर सवलतीचा लाभ मिळत नाही. परंतू यामध्ये तुम्हाला चार प्रकारचे रायडर्स मिळतात. यामध्ये अपघाती मृत्यू आणि अपंगत्व रायडर, अपघात लाभ रायडर, नवीन टर्म इन्शुरन्स रायडर आणि नवीन गंभीर लाभ रायडर यांचा समावेश आहे. मृत्यू लाभामध्ये, नॉमिनीला पॉलिसीचा 125 टक्के मृत्यू लाभ मिळेल.


महत्वाच्या बातम्या:


करोडपती व्हायचंय? 10 लाखांची गुंतवणूक करा, 1 कोटी 5 लाख मिळवा, नेमकी काय आहे योजना?