मुंबई : आर्थिक वर्ष 2023-24 साठी आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 आहे. या तारखेनंतर तुम्हाला आयटीआर भरायचा असेल तर दंड द्यावा लागेल. नियमत आयटीआर भरण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्ही करदाते नसले तरीही आयटीआर भरणे फायद्याचे ठरू शकते. केंद्र सरकानरे करदात्यांसाठी 07 जून 2021 रोजी एक पोर्टल लॉन्च केले होते. या पोर्टलचेही अनेक फायदे आहेत. या पोर्टलच्या मदतीनेच करदात्यांना कर भरता येऊ शकतो. दरम्यान, तुम्ही आयटीआर दाखल केल्यानंतर कर भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्हाला कोणकोणते फायदे होऊ शकतात, ते जाणून घेऊ या. क्रेडिट कार्डच्या मदतीने कर भरल्यास तुम्हाला कॅशबॅक मिळू शकते.
क्रेडिट कार्डचा वापर का करावा?
क्रेडिट कार्ड वापरण्याचे अनेक फायदे आहेत. प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलच्या मदतीने क्रेडिट कार्डने कर भरल्यास तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. सर्वप्रथम क्रेडिट कार्डने करभरणा केल्यास तुम्हाला जवळ रोख रक्कम ठेवण्याची गरज नाही. तसेच कोणतेही बँक ट्रान्सफर करण्याची गरज नाही. तुमचा कर तत्काळ भरला जाऊ शकतो. क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्हाला कधीही, कोणत्याही क्षणात कर भरता येतो. यामुळे लेट फी, व्याज अशा अतिरिक्त चार्चेसमुळे तुमचा खिसा खाली होणार नाही.
क्रेडिट कार्डने कर भरल्यास लगेच कन्फर्मेशन
क्रेडिट कार्डने कर भरल्यावर कर भरल्याचे नोटिफीकेशन लगेच येते. चेकि किंवा बँक ट्रान्सफरच्या मदतीने कर भरल्यास बराच वेळ जातो. त्यामुळे तुमचा कर भरला गेला आहे की नाही याबद्दल अनिश्चितता असते. याऊलट क्रेडिट कार्डने कर भरल्यास तुम्हाला लगेच कर भरल्याचे नोटिफीकेशन मिळते.
क्रेडिट कार्डच्या कंपन्या देतात रिवॉर्ड
दरम्यान, काही कंपन्या क्रेडिट कार्डने कर भरल्यास तुम्हाला रिवॉर्ड देतात. पण काही निवडक क्रेडिट कार्ड्सवरच तुम्हाला हा रिवॉर्ड मिळतो. एचडीएफसी बिजब्लॅक, एचडीएफसी बिजपॉवर क्रेडिट कार्ड असे कार्ड कर भरल्यास रिवॉर्ड देतात. हे कार्ड प्राप्तिकर आणि जीएसटी पेमेंटवर क्रमशः 16 आणि 8 टक्क्यांपर्यंत बचत करण्याचा ऑप्शन देतात. तर काही कार्ड्स हे माईलस्टोन लाभ देतात. एसबीआय विस्तारा कार्ड/आयडीएफसी विस्तारा कार्डतर्फे तुम्हाला कॉम्प्लीमेंट्री फ्लाइट तिकीट देते.
हेही वाचा :
खुशखबर! EPFO खातेधारकांना लवकरच मिळणार व्याज, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ, सध्या सोन्याचा दर किती? अर्थसंकल्पानंतर किंमती कमी होणार का?