Anant-Radhika Honeymoon: मुकेश (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या लेकाचा लग्नसोहळा अगदी राजेशाही थाटात पार पडला. अनंत (Anant Ambani) आणि राधिका (Radhika Merchant) शुक्रवार 12 जुलै रोजी लग्नबंधनात अडकले. पण शनिवार आणि रविवार हे दोन दिवसही त्यांच्या लग्नानंतरचे काही सोहळे पार पडणार आहेत. शनिवार 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद सोहळा आणि रविवार 14 जुलै रोजी रिसेप्शन पार पडणार आहे. पण हे सगळं झाल्यानंतर हे जोडपं हनीमूनला कुठे जाणार याची जोरदार चर्चा सुरु सध्या सुरु झाली आहे. 


अनंत आणि राधिकाचा विवाहसोहळा हा अगदी खास ठरला. त्यामुळे त्यांचा हनीमूनही तितकाच खास असणार असल्याचं म्हटलं जात आहे. परदेशातच हे जोडपं हनीमूनला जाणार असल्याचंही म्हटलं जातंय. परंतु अंबानी कुटुंबाकडून अद्यापही या नव्या जोडप्याच्या हनीमूनविषयी कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाहीये. मागील अनेक दिवसांपासून अनंत आणि राधिकाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. त्यानंतर आता त्यांच्या हनीमूनच्या चर्चांना जोर आला आहे.                                           


हनीमूनसाठी अनंत-राधिका कुठे जाऊ शकतात?


फिजी आयलँड - अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्नानंतर त्यांच्या रोमँटिक हनीमूनसाठी फिजी आयलँडवर जाऊ शकतात. येथे अनेक आलिशान बेटे आहेत. नवविवाहित जोडप्यांना एकत्र वेळ घालवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. 



दक्षिण आफ्रिका - अनंत आणि राधिका त्यांच्या हनीमूनसाठी दक्षिण आफ्रिकेला पर्याय म्हणून ठेवू शकतात. 


स्वित्झर्लंड - स्वित्झर्लंड हे प्रत्येक हनिमूनरचे ड्रीम डेस्टिनेशन असते. येथे बर्फाच्छादित पर्वत, लेक जिनिव्हा, लेक ल्युसर्न सारखी सुंदर तलाव मनाला भुरळ घालतात.  अनंत-राधिका या नवविवाहित जोडप्यासाठी हे योग्य हनिमून डेस्टिनेशन असू शकते.


बोरा बोरा आयलँड - बोरा बोरा हे एक स्पेशल हनीमून डेस्टिनेशन आहे. हे बेट त्याच्या सौंदर्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. या बेटावरही अनंत-राधिका त्यांच्या हनीमूनसाठी जाऊ शकतात. 


ब्रिटिश व्हर्जिन आयलँड - नवविवाहित जोडप्यांसाठी एक अतिशय रोमँटिक ठिकाण आहे. येथील सुंदर बीचवर कपल्स खूप एन्जॉय करतात. हा पर्याय देखील अनंत आणि राधिकाच्या हनिमून डेस्टिनेशनच्या यादीत असू शकतो.


ही बातमी वाचा : 


Marathi Actor : 'अली बाबा त्याचे 40 चोर, शिनचॅन, हेच काय ते उरलेत...', अंबानींच्या लग्नात जॉन सीनाच्या उपस्थितीवरुन मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट