मुंबई : केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने 7 कोटी ईपीएफओ सदस्यांना मोठी खुशखबर दिली आहे. मंत्रालयाने ईपीएफओ खातेधारकांच्या ठेवीवर वाढीव व्याजाला मंजुरी दिली आहे. या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने  अर्थात ईपीएफओने आर्थिक वर्ष 2023-24 साठी व्याजदर 8.25 टक्के करण्याची घोषणा केली होती. याच निर्णयाला आता वित्त मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. 


व्याजदारातील वाढीला मंजुरी 


ईपीएफओने आर्थिक वर्ष 2023-24 साठी व्याजदर वाढवून 8.25 टक्के केला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी हा व्याजदर 8.15 टक्के होता. या निर्णयाची ईपीएफओ सोशल मीडियावर सविस्तर माहिती दिली आहे. वित्त वर्ष 2023-24 साठी ईपीएफओ खातेदारांना 8.25 टक्के व्याजदाराचा फायदा मिळणार आहे. आता वित्त मंत्रालयाच्या मंजुरीनंतर ईपीएफओ खातेधारकांना वाढीव व्याजदराने मिळालेले व्याज खात्यावर जमा होण्याची प्रतीक्षा आहे. 


ईपीएफओने नेमकं काय सांगितलंय? 


ईपीएफओने एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करून मंजूर केलेल्या व्याजदरावर सविस्तर माहिती दिली आहे. ईपीएफ तिमाही व्याजदर घोषित करत नाही.  नव्या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नवे वार्षिक व्याजदर घोषित केले जातात.  


ईपीएफओ खात्याची माहिती कशी तपासता येईल? 


तुम्हाला ईपीएफ खात्याची माहिती तपासायची असेल तर उमंग अॅपवर तुम्ही ते चेक करू शकता. लॉग ईन करून तुम्हाला तुमच्या ईपीएफ खात्याची सर्व माहिती मिळेल.  .


EPF संकेतस्थळाच्या मदतीनेही तुम्ही तुमच्या पासबुकची माहिती घेऊ शकता. EPF इंडिया संकेतस्थळावर जाऊन “For Employees” हा ऑप्शन निवडावा. त्यानंतर “Services” टॅबवर जाऊन “Member Passbook” वर क्लीक करावे. त्यानंतर लॉग इन करण्यासाठी UAN, पासवर्ड, तसेच कॅप्चा टाकावा. तुम्हाला तुमच्या खात्याची माहिती मिळेल.  


एसएमएस सेवा: एसएमएस सेवेच्या मदतीनेही तुम्हाला तुमच्या पासबुक खात्याची माहिती मिळेल. त्यासाठी 7738299899 या मोबाईल क्रमांकावर “EPFOHO UAN” हा संदेश पाठवावा.


मिस्ड कॉल सेवा: नोदंणीकृत मोबाईल क्रमांच्या मदतीने तुम्ही 9966044425 या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास तुम्हाला तुमच्या पासबुकच्या सर्व डिटेल्स प्राप्त होतील.


हेही वाचा :


Anant Ambani - Radhika Merchant Wedding : जगभरातील वऱ्हाडींची मांदियाळी, सासऱ्यांसोबत सुनेची एन्ट्री; अनंत-राधिकाच्या राजेशाही लग्नसोहळ्याची बातच न्यारी!


प्रायव्हेट जेट, 550 कोटींचा खर्च अन् हजारो पाहुणे, अनंत-राधिकाच्या लग्नाआधी 'या' लग्नाची झाली होती जगभरात चर्चा!


John Cena Anant Ambani - Radhika Merchant : अनंत-राधिकाच्या लग्नात जॉन सिनाचा देसी लूक!