एक्स्प्लोर

2 October NO UPI Day : 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण

Maharashtra Traders NO UPI Campaign: यूपीआय व्यवहारांवर लागणाऱ्या MDR चा अतिरिक्त आर्थिक भार व्यापाऱ्यांवर पडत असल्याने राज्यातील व्यापाऱ्यांनी 2 ऑक्टोबर रोजी NO UPI मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : डिजिटल पेमेंटचे मुख्य माध्यम असलेल्या यूपीआय (UPI) व्यवहारांवरील एमडीआर (MDR - Merchant Discount Rate) च्या मुद्द्यावरून राज्यातील व्यापारी वर्ग आक्रमक झाला आहे. एमडीआरच्या नावाखाली व्यापाऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकला जात असल्याचा आरोप करत, याविरोधात सामूहिक भूमिका मांडण्यासाठी 2 ऑक्टोबर रोजी राज्यभरात NO UPI - NO PAYMENT मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या (MACCIA) वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन बैठकीत राज्यातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हा एकमुखाने निर्णय घेतला आहे.

Maharashtra Chamber Of Commerce : डिजिटल प्रणालीला विरोध नाही

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यूपीआय हे डिजिटल पेमेंटचे अत्यंत महत्त्वाचे माध्यम असून चेंबरचा यूपीआयच्या (UPI) वापराला किंवा डिजिटल व्यवहारांना अजिबात विरोध नाही, असे स्पष्टीकरण या बैठकीत देण्यात आले.

मात्र, यूपीआय व्यवहारांवर आकारल्या जाणाऱ्या एमडीआरमुळे लहान-मोठ्या व्यापाऱ्यांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक ताण पडत आहे. हा आर्थिक भार व्यापाऱ्यांवर टाकला जाऊ नये, हीच व्यापारी वर्गाची मुख्य मागणी असल्याचे चेंबरने अधोरेखित केले आहे.

2 October No UPI Day Rules : 2 ऑक्टोबरला व्यापारी काय करणार?

आपली एकजूट आणि सामूहिक भूमिका शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापाऱ्यांनी खालील उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे:

केवळ कॅश व्यवहार : 2 ऑक्टोबर रोजी सर्व व्यापारी बांधव यूपीआय पेमेंट पूर्णपणे बंद ठेवून केवळ रोख (Cash) पेमेंटचा पर्याय स्वीकारतील.

सोशल मीडिया कॅम्पेन : व्यापारी बांधव 2 ऑक्टोबर रोजी आपल्या WhatsApp DP, Facebook, Instagram Story आणि Status वर “NO UPI - NO PAYMENT | ZERO MDR” असा मेसेज ठेवून मोहिमेला पाठिंबा दर्शवतील.

एकजूट दाखवण्याचे आवाहन : “एक दिवस, एक भूमिका, एकजूट  NO UPI - NO PAYMENT” या सूत्राखाली राज्यातील सर्व लहान-मोठ्या दुकानदारांनी व व्यापाऱ्यांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Zero MDR Demand Merchants : झिरो एमडीआरची प्रमुख मागणी

यूपीआय व्यवहारांवर झिरो एमडीआर (Zero MDR) धोरण लागू राहावे, अशी व्यापाऱ्यांची मुख्य मागणी आहे. 2 ऑक्टोबरचा हा बंद कोणालाही अडचणीत आणण्यासाठी नसून, व्यापाऱ्यांवर पडणारा अवाजवी आर्थिक भार रोखण्यासाठी काढलेला शांततापूर्ण मार्ग असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने स्पष्ट केले आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

9 ते 5 ची नोकरी सोडली, कंटेंट क्रिएशनची आवड जोपासली, अल्पावधीतच साराने मिळवले तब्बल  82.27 लाख रुपये 
9 ते 5 ची नोकरी सोडली, कंटेंट क्रिएशनची आवड जोपासली, अल्पावधीतच साराने मिळवले तब्बल  82.27 लाख रुपये 
ना धोका ना कोणती भीती! 5 वर्षात 5 लाख रुपये मिळवा, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे जबरदस्त योजना
ना धोका ना कोणती भीती! 5 वर्षात 5 लाख रुपये मिळवा, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे जबरदस्त योजना
सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण! खरेदीदारांना मोठी संधी तर गुंतवणूकदारांना फटका, ज्यांनी 10 लाख गुंतवले त्यांचं किती झालं नुकसान
सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण! खरेदीदारांना मोठी संधी तर गुंतवणूकदारांना फटका, ज्यांनी 10 लाख गुंतवले त्यांचं किती झालं नुकसान
Narendra Modi On Gold Rate: सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Advertisement

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
Ashish Shelar on Shiv Sen Sonia Gandhi Book : शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
आधीच दुष्काळ, त्यात शेतातील विद्युत तारांच्या स्पर्शाने भीषण आग, शेतकऱ्याचा पाच एकरावरील ऊस जळून खाक
आधीच दुष्काळ, त्यात शेतातील विद्युत तारांच्या स्पर्शाने भीषण आग, शेतकऱ्याचा पाच एकरावरील ऊस जळून खाक
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
Hemant Nimbalkar : अपुन के एरिया में लफड़ा नहीं! सुधारायचे असेल तर ठीक, नाहीतर पोलिसांची बंदूक फक्त 'शो'साठी नाही; बेंगळुरुच्या सुरक्षेची जबाबदारी मिळताच हेमंत निंबाळकरांचा गुंडांना इशारा 
अपुन के एरिया में लफड़ा नहीं! सुधारायचे असेल तर ठीक, नाहीतर पोलिसांची बंदूक फक्त 'शो'साठी नाही; बेंगळुरुच्या सुरक्षेची जबाबदारी मिळताच हेमंत निंबाळकरांचा गुंडांना इशारा 
Embed widget