एक्स्प्लोर

Mythos AI : अँथ्रोपिकच्या मायथोज एआय मॉडेलचा धसका, वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी घेतली बँकांची बैठक, बँकांना काय सांगितलं?

Anthropic Mythos AI Model: अँथ्रोपिकच्या मायथोज एआय मॉडेलमुळं निर्माण होणाऱ्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.  

Anthropic Mythos AI Model नवी दिल्ली : एआय कंपनी अँथ्रोपिकचं एआय मॉडेल मायथोज सध्या चर्चेत आहे. हे मॉडेल शक्तिशाली असल्यानं याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्यानं कंपनीनं सार्वजनिक वापरासाठी लाँच केलेलं नाही. मायथोज एआय सॉफ्टवेअरमधील बग्जचा शोध घेतं. ज्या बग्जचा शोध आजपर्यंत कोणी घेऊ शकलं नाही ते बग्ज शोधण्यात मायथोजला यश येतं. मायथोज एआय मॉडेलमुळं बँका आणि वित्तीय संस्थांना धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारमण यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या.

मायथोज शक्तिशाली एआय मॉडेल 

मीडिया रिपोर्टनुसार, मायथोज एआय मॉडेलनं बँकांसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकांना सतर्क आणि सज्ज राहण्यासाठी सांगितलं आहे.वेगवेगळ्या वित्तीय संस्था आणि बँकांनी योग्य समन्वय ठेवण्याची गरज असल्याचं सीतारमण यांनी म्हटलं. या बैठकीला माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव देखील उपस्थित होते. रिपोर्टनुसार मायथोज मॉडेलसंदर्भात भारतानं अमेरिकेत अँथ्रोपिकच्या वरिष्ठ नेतृत्त्वाशी चर्चा करण्यात आली आहे.  

निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मायथोजच्या धोक्यासंदर्भात चर्चा झाली. सीतारमण यांनी बँक अधिकाऱ्यांना सतर्कता  बाळगण्याचं आणि संरक्षणात्मक दृष्ट्या पाऊल उचलण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. बँकांनी त्यांच्या सिस्टीमला एआय मॉडेलपासून सुरक्षित बनवावं. याशिवाय इंडियन बँक असोसिएशनननं देखील संस्थात्मक मेकॅनिझम तयार करण्याचा सल्ला दिला, ज्याद्वारे वेगवान आणि परिणामकारक पद्धतीनं मायथोज मॉडेलचा सामना करता येईल. सीतारमण यांनी बँकांना त्यांच्या संरक्षणात्मक  सिस्टीम मजबूत करण्यासाठी बेस्ट सायबर तज्ज्ञांची मदत घेण्यास सांगितलं.  

मायथोज मॉडेलची भीती का?

अँथ्रोपिकचं मायथोज मॉडेल शक्तिशाली असल्यानं जगभरात चिंता निर्माण झाली आहे. यामुळं कंपनीनं मायथोज मॉडेल सार्वजनिकरित्या लाँच केलेलं नाही. अँथ्रोपिकच्या दाव्यानुसार सायबर सिक्युरिटीसंदर्भातील टास्क, बग्ज शोधण्यासाठी आणि ते काढण्यासाठी हे मॉडेल माणसांना मागं टाकू शकतं. या मॉडेलनं काही सॉफ्टवेअरमधील कित्येक वर्ष जुन्या बग्जचा शोध घेतला आहे. यामुळं कंपनी त्यांच्या विश्वासार्ह भागीदारांसोबत त्याची चाचणी करत आहेत. या दरम्यान कोणत्या तरी ग्रुपनं या मॉडेलचा अप्रमाणित अॅक्सेस मिळवला आहे, त्यामुळं चिंता वाढली आहे.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget