(Source: ECI/ABP News/ABP Majha)
निवडणूक संपली आता रेपो रेटचं काय होणार? तुमचा इएमआय वाढणार का? RBI च्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष!
लोकसभा निवडणूक संपली आहे. त्यानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँक 7 जून रोजी रेपो रेट जाहीर करणार आहे. यावेळी आरबीआय रेपो रेटबाबत काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई : लोकसभा निवडणूक संपलेली आहे. आता लवकरच देशातील अनेक धोरणांत बदल होतील. यातील अनेक बदलांचा तुमच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम पडेल. भारतीय रिझर्व्ह बँकदेखील 7 जून रोजी असाच एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे . 7 जून रोजी आरबीआयकडून रेपो रेट ठरवले जाणार आहेत. या रेपोरेटनुसार तुमच्या गृह तसेच इतर कर्जाच्या हफ्त्यात वाढ होणार की नाही? हे स्पष्ट होईल.
सध्याचा रेपो रेट 6.50 टक्के
पाच जूनपासून आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक चालू आहे. ही तीन दिवसीय बैठक 7 जून रोजी संपत आहेत. या बैखीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास रेपो रेटबाबत महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. सध्या रेपो रेट 6.50 टक्के आहे. गेल्या सलग सात वेळा आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे उद्या आरबीआय रेपो रेटमध्ये वाढ करणार की त्यात कपात केली जाणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
नव्या वित्त वर्षातील दुसरी बैठक
सध्या देशात लोकसभा निवडणूक संपली आहे. आता देशात भाजपप्रणित एनडीए सरकारची स्थापना होणार आहे. देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. असे असताना आता आरबीआय रेपो रेटसंदर्भात काय निर्णय घेणार, कर्जदारांचे ईएमआय कमी होणार की वाढणा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीची नव्या वित्त वर्षातील ही दुसरी बैठक आहे.
रेपो रेट वाढणार का?
दरम्यान, यावेळी रेपो रेट वाढणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आरबीआयने याआधी फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो रेट 6.5 टक्के केला होता. त्यानंतर लगातार सात वेळा रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
हेही वाचा :
गौतम अदाणींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे; बनले भारत, आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती!