(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सावधान! 31 मार्च जवळ, उरले फक्त 10 दिवस, 'ही' 6 कामं पूर्ण करण्याची शेवटची संधी
आर्थिक वर्ष (financial year) संपायला फक्त 10 दिवसच उरले आहेत. त्यामुळं त्यापूर्वीच काही महत्वाची कामं (Important tasks) पूर्ण करणं गरजेचं आहे
Personal Finance Tasks : आर्थिक वर्ष (financial year) संपायला फक्त 10 दिवसच उरले आहेत. त्यामुळं त्यापूर्वीच काही महत्वाची कामं (Important tasks) पूर्ण करणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळं दक्षता घेणं गरजेचं आहे. दरम्यान, आज आपल्याला 31 मार्चपर्यंत कोणती काम पू्र्ण करावी लागणार आहेत, यासंदर्भातील माहिती पाहणार आहोत.
आयकर रिटर्न
सर्वात महत्वाचे म्हणजे आयकर रिटर्न भरणे. करदात्यांच्या दृष्टीनं आयकर भरणे हे अत्यंत महत्वाचे काम आहे. हे काम तुम्ही 31 मार्चपूर्वीच पूर्ण करणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला पुन्हा अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
TDS दाखल करणे
कर दात्यांना वेगवेगळ्या सवलतींचा फायदा घेण्यासाठी TDS दाखल करण्याचं प्रमाणापत्र आवश्यक आहे. ते प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय तुम्हाला विविध सवलतींचा फायदा घेऊ शकणार नाही. त्यामुळं ते प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. यासाठी 31 मार्च ही अंतिम मुदत आहे, त्यापूर्वीच हे काम करणं गरजेचं आहे.
GST संरचना योजनेसाठी अर्ज
GST संरचना योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 मार्च आहे. पात्र व्यक्तिंनी 31 मार्च 2024 पूर्वी या योजनेसाठी अर्ज करु शकतात. यासाठी CMP-02 फॉर्म भरावा लागणार आहे. दरम्यान, ज्या GST करदात्यांची वार्षिक उलाढाल 1.5 कोटी रुपये आहे तेच या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
31 मार्चपूर्वी फास्टॅग केवायसी पूर्ण करावी
अनेक महत्वाच्या कामांपैकी एक काम म्हणजे फास्टॅग केवायसी पूर्ण करणे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) फास्टॅग ग्राहकांनी त्यांची फास्टॅग केवायसी लवकरात लवकर पूर्ण करणं गरजेचं आहे. तुम्ही अद्याप फास्टॅग केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर ती 31 मार्चपर्यंत पूर्ण करावी. 31 मार्चपर्यंत फास्टॅग केवायसी न केल्यास तुमचा फास्टॅग नंतर काळ्या यादीत टाकला जाऊ शकतो. फास्टॅग ही महामार्गावरील टोल गोळा करण्याची ही एक इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे बँक खात्याशी किंवा प्रीपेड कार्डशी जोडलेल्या कारच्या विंडस्क्रीनवर स्थापित केलेल्या टॅगमधून RFID तंत्रज्ञान वापरून पैसे कापले जातात.
गुंतवणुकीवर कर सवलत
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळवायची असेल तर त्यासाठी 31 मार्च ही अंतिम तारीख आहे. दरम्यान, कर वाचवण्यासाठी कलम 80C अंतर्गत तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत. विविध योजनांमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही कर वाचवू शकता.
विविध योजनात गुंतवणूक
विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत ही 31 मार्च आहे. 31 मार्चपूर्वी तुम्हाला या योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागतो. PPF योजनेत तुम्हाला वर्षभरात किमान 500 रुपये आणि समृद्धी सुकन्या योजनेत तुम्हाला कमीत कमी 250 रुपये गुंतवावे लागतील.तसे न केल्यास, तुमचे खाते डीफॉल्ट घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळं तुम्हाला पुन्हा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
प्रचंड उत्पन्न मिळवून देणाऱ्या SBI च्या 5 योजना कोणत्या? 31 मार्चपूर्वी 'या' 2 योजनांचा घेता येणार लाभ