एक्स्प्लोर

नाशिक जिल्हा बँकेकडून 56 हजार शेतकऱ्यांना जमीन जप्तीच्या नोटीसा,  उद्या काळाराम मंदिरात साकडे आंदोलन

नाशिक जिल्हा बँकेच्या थकित कर्जदारांकडून उद्या काळाराम मंदिरात साकडे आंदोलन करण्यात येणार आहे.  सीता नवमीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी घालणार सीतामाईला साकडे घालणार आहेत.

Nashik : नाशिक जिल्हा बँकेच्या थकित कर्जदारांकडून उद्या काळाराम मंदिरात साकडे आंदोलन करण्यात येणार आहे.  सीता नवमीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी घालणार सीतामाईला साकडे घालणार आहेत. शेतकरी संघटना कर्जमुक्ती आंदोलन समितीकडून हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्हा बँकेकडून तब्बल 56 हजार शेतकऱ्यांना जमीन जप्तीच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्यानंतर नाशिक जिल्हा बँकेला राज्य सरकारकडून निधी देण्याची मागणी केली जात आहे. 

नाशिक जिल्हा बँक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडली असून जिल्हा बँकेच्या 56 हजार थकीत कर्जदारांना जमीन जप्तीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली, तसेच जिल्हा बँकेला आर्थिक मदतची घोषणा देखील करण्यात आली. मात्र कोणतीही कार्यवाही अद्याप पर्यंत झाली नसल्याने शेतकरी संघटना कर्जमुक्ती समितीच्या माध्यमातून उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरात सीता नवमीच्या पार्श्वभूमीवर सीतामाईला साकडे घालत आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकरी संघटनेचे पदाधिकारी भगवान बोराडे यांनी सरकार घोषणा करते कृषिमंत्री स्थगिती देतात तर, जिल्हा बँकेचे प्रशासक राजीनामा देतात यामुळे जिल्हा बँक अडचणीतून बाहेर येणार तरी कशी असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 

नाशिक जिल्हा बँकेचे एकूण 2200 कोटी रुपयांचे कर्ज थकीत

नाशिक जिल्हा बँकेचे एकूण 2200 कोटी रुपयांचे कर्ज (Loan) थकीत आहे. बँक आर्थिक अडचणीत असल्यामुळे सक्तीची कर्जवसुली केली जात असून जिल्ह्यातील 40 हजार कर्जदारांना सहकार कायद्याच्या कलम 101 अंतर्गत नोटीस बजावली. त्यापैकी 1100 कर्जदारांच्या मालमत्तेवर बँकेचे नाव लागले आहे. बँकेच्या या प्रक्रियेस शेतकरी संघटनांनी विरोध केला. सरकार कर्जमाफी देणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी (Farmer) अडचणीत सापडला आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी बँकेने कर्जाच्या प्रकारानुसार ‘वन टाईम सेटलमेंट’ (ओटीएस) ही योजना राबवावी, त्याला शेतकरी निश्चितपणे प्रतिसाद देतील, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत. जिल्हा बँकेचे 28 हजार कर्जदारांकडे एक लाखापर्यंतचे 50 टक्के कर्ज थकीत आहे. तर पाच लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेले 45 टक्के खातेदार आहेत. त्यामुळे ९३ टक्के कर्जदार हे पाच लाखांच्या आतील आहेत. त्यांच्यासाठी जिल्हा बँक ही आरबीआय नाबार्डच्या नियमांचा व्यवस्थितरित्या अभ्यास करुन -‘ओटीएस’ योजना लागू करणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

RBI : ट्रम्प टॅरिफचा सामना करण्यासाठी आरबीआय सर्वात मोठा निर्णय घेणार, रेपो रेट 6 टक्क्यांच्या खाली आणणार, कर्ज स्वस्त होणार?

 

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget