मुंबई : देशातील सर्वांत श्रीमंत असलेले मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आता डायग्नॉस्टिक सेगमेंटमध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. त्यांच्या रिलायन्स उद्योग समूहाच्या (Reliance Industries) रिलायन्स रिटेल व्हेंचर्स या कंपनीने त्यासाठी एक आराखडा तयार केला आहे. या योजनेनुसार आगामी काळात रिलायन्स रिटेल व्हेंचर्स ही कंपनी एखाद्या डायग्नॉस्टिक कंपनीत हिस्सेदार होण्याची शक्यता आहे.
खर्च करणार 1 ते 3 हजार कोटी
बिझनेस लाईनच्या एका रिपोर्टनुसार रिलायन्स रिटेल व्हेंचर्स ही कंपनी डायग्नॉस्टिक क्षेत्रात स्वत:चा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी ही कंपनी एक ते तीन हजार कोटी रुपये खर्च करण्याच्या तयारीत आहे. या पैशांतून डायग्नॉस्टिक सर्व्हिस प्रोव्हाईडर कंपनीत हिस्सेदारी खरेदी केली जाणार आहे. संबंधित कंपनीचा जास्तीत जास्त हिस्सा खरेदी करण्याचा प्रयत्न रिलायन्स रिटेल व्हेंचर्सकडून केला जाणार आहे.
नेटमेड्स कंपनीचे अनेक कंपन्यांशी करार
रिलायन्स इंडस्ट्रिची औद्योगिक क्षेत्रात काम करणारी स्वत:ची नेटमेड्स नावाची एक उपकंपनी आहे. या कंपनीने थायरोकेअर, हेल्दियन्स अशा अनेक कंपन्याशी करार केलेले आहेत. या कराराच्या मदतीने नेटमेड्स ही कंपनी आपल्या ग्राहकांना पॅथोलॉजीच्या सेवा पुरवते. या कंपनीकडून ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने औषधांची विक्रीही केली जाते.
2020 साली नेटमेड्सचं अधिग्रहण
रिलायन्स उद्योग समूहाने नेटमेड्स या कंपनीचे 2020 साली अधिग्रहण केले होते. त्यावेळी मुकेश अंबानी यांनी 620 कोटी रुपये देऊन या कंपनीची बहुसंख्य हिस्सेदारी खरेदी केली होती. नेटमेड्स ही कंपनी अगोदर फक्त ऑनलाईन पद्धतीनेच काम करायची. रिलायन्सने अधिग्रहित केल्यानंतर ही कंपनी आपल्या सेवा ऑफलाईन पद्धतीनेदेखील देऊ लागली. या कंपनीचे पहिला ऑफलाईन स्टोअर 2023 मध्ये चालू करण्यात आला होता. आतापर्यंत या कंपनीचे देशभरात एक हजारपेक्षा अधिक स्टोअर चालू करण्यात आले आहेत.
रिलायन्स समूहाने अद्याप काहीही सांगितलेले नाही
स्वत:ची पॅथोलॉजी सेवा पुरवणाऱ्या, देशभरात डायग्नॉस्टिक सेंटर्स असलेल्या कंपनीचा हिस्सा खरेदी करण्याचा प्रयत्न आता रिलायन्स उद्योग समूहाकडून केला जातोय. रियायन्सचा हा विचार सत्यात उतरल्यास हा उद्योग समूह वैद्यकीय क्षेत्रातही मुसंडी मारू शकतो. या योजनेबाबत रिलायन्स उद्योग समूहाने मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचा :
'या' चार लार्ज कॅप फंडाचे लार्ज फायदे! SIP केल्यास मिळतील तब्बल 21 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स
या आठवड्यात येणार 'हे' सहा आयपीओ, कमाईचा सिक्सर मारण्याची नामी संधी!