Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'या' चार लार्ज कॅप फंडाचे लार्ज फायदे! SIP केल्यास मिळतील तब्बल 21 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स
सध्या शेअर बाजारात मोठा चढ-उतार दिसतोय. त्यामुळे अशा काळात म्यूच्यूअल फंड हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरतो. याच पार्श्वभूमीवर चांगले रिटर्न्स देण्याची क्षमता असलेले चार लार्ज कॅप फंड्स जाणून घेऊ या..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटाटा लार्ज कॅप फंडाने गेल्या तीन वर्षांत साधारण 18.08 टक्के प्रतिवर्ष SIP रिटर्न दिलेले आहेत. या फंडात तुम्ही अगदी 100 रुपयांच्या SIP ने गुंतवणूक करू शकता. या मूच्यूअल फंडाची साईझ 2103 कोटी रुपये आहे.
Sundaram Nifty 100 Equal Weight या फंडाने गेल्या तीन वर्षात साधारण 19.15 टक्के SIP रिटर्न्स दिले आहेत. गेल्या तीन वर्षांत या फंडात 10 हजारांची एसआयपी करणाऱ्या लोकांच्या पैशांचे मूल्य 5,04,646 रुपये झालेले आहे. या फंडात 100 रुपये प्रतिमहिन्याच्या हिशोबाने एसआयपी करता येईल. या फंडाची साईझ 76 कोटी रुपये आहे.
Sundaram Large Cap Fund ने आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. गेल्या तीन वर्षांत एसआयपीतून मिळाणाऱ्या रिटर्न्सचे हे प्रमाण साधारण 16.70 टक्के आहे. या फंडात प्रतिमहा 10000 रुपयांची एसआयपी करणाऱ्यांच्या पैशांचे मूल्य आज 4,60,216 रुपए झाले आहे. या फंडात कमीत कमी 100 रुपयांची एसआयपी करता येते. या फंडाची साईझ 3231 कोटी रुपये आहे..
क्वांट फोकस्ड फंड या फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. गेल्या तीन वर्षांपासून एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांना या फंडाने साधारण 21.11 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. तीन वर्षांपासून 10000 रुपयांची एसआयपी करणाऱ्यांना या फंडाने 5,30,250 लाख रुपये दिले आहेत. या फंडात कमीत कमी 1000 रुपयांच्या एसआयपीने सुरुवात करता येते. या फंडाची साईझ 925 कोटी रुपये आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)