Maharashtra Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान संपूर्ण देशभरामध्ये आज (13 मे) पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील पुणे, मावळ आणि शिरूर या तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये पहिल्या सहा तासांमध्ये मतदानाला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. पुणे लोकसभेला दुपारी एक वाजेपर्यंत 26.48 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.  मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत 27.14 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये अवघ्या 20.89 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पहिल्या सहा तासांमध्ये मतदानासाठी थंडा प्रतिसाद मिळाल्याने दुपारनंतर अखेरच्य सत्रामध्ये मतदान वाढतं का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल. 


पहिल्या तीन टप्प्यांमध्ये मतदानाचा टक्का घसरल्याने राजकीय पक्षांमध्ये शांतता पसरली असतानाच चौथ्या टप्प्यामध्ये देखील मतदानासाठी पहिल्या सहा तासांमध्ये अल्प प्रतिसाद दिसून आल्याने राजकीय पक्षांची चिंता आणखी वाढली आहे. पुण्यात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होत आहे. मावळमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना आहे, तर शिरुरमध्ये तुतारी विरुद्ध घड्याळ असा सामना आहे. अनेक मातब्बरांनी सभा घेत तिन्ही मतदारसंघ पिंजून काढले आहेत. 


सर्वाधिक मतदान कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये


पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये झाले आहे कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत 31 टक्के मतदानाची नोंद झाली. वडगाव शेरीमध्ये 24.85 टक्के मतदानाची नोंद झाली. शिवाजीनगरमध्ये 23.26 टक्के मतदानाची नोंद झाली. कोथरूडमध्ये 29.1 टक्के मतदानाची नोंद झाली. पर्वतीमध्ये 27.14 टक्के मतदानाची नोंद झाली. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये 23.21 टक्के मतदानाची नोंद झाली.


मावळ लोकसभेला काय स्थिती?


शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष असलेल्या मावळ लोकसभेमध्ये सुद्धा दुपारी एक वाजेपर्यंत पनवेल मतदारसंघांमध्ये 26.93 टक्के मतदानाची नोंद झाली. कर्जतमध्ये 29.47 टक्के मतदानाची नोंद झाली. उरणमध्ये 29.6 टक्के मतदानाची नोंद झाली. मावळमध्ये 28.3 टक्के मतदानाची नोंद झाली. चिंचवडमध्ये 26.12 टक्के मतदानाची नोंद झाली. पिंपरीमध्ये 23.96 टक्के मतदानाची नोंद झाली. 


शिरुर लोकसभेला काय स्थिती?


शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत जुन्नर मतदारसंघांमध्ये 19.76 टक्के मतदानाची नोंद झाली. आंबेगावमध्ये 19.99 टक्के मतदानाची नोंद झाली. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघांमध्ये 23.6 टक्के मतदानाची नोंद झाली. शिरूरमध्ये 15.27 टक्के मतदानाची नोंद झाली. भोसरीमध्ये 24.27 टक्के मतदानाची नोंद झाली. हडपसरमध्ये 21.37 टक्के मतदानाची नोंद झाली. पुणे आणि मावळ लोकसभेच्या तुलनेमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत थंडा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. शिरूरमध्ये सर्वात कमी15.27 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे आता दुपारच्या सत्रामध्ये मतदानाचा टक्का वाढतो का? याकडे सुद्धा लक्ष असेल. 


इतर महत्वाच्या बातम्या