या आठवड्यात येणार 'हे' सहा आयपीओ, कमाईचा सिक्सर मारण्याची नामी संधी!

या आठवड्यात अनेक कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. या आयपीओंच्या माध्यमातून चांगला पैसे कमवण्याची नामी संधी आहे.

ipo (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)

1/7
या आठवड्यात एकूण सहा कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. यामध्ये गो डिजीट, इंडियन इमल्सीफायर अशा कंपन्यांचा समावेश आहे.
2/7
इन्शुरन्स टेक स्टार्टअप गो डिजिट या कंपनीचा आयपीओ 15 मे रोजी येणार आहे. 17 मे पर्यंत या आयपीओत गुंतवणूक करण्याची संधी आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 258-272 रुपये प्रतिशेअर आहे. या कंपनीत गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला एकाच वेळी 55 शेअरचा लॉट घ्यावा लागेल. क्रिकेटपटू विराट कोहली, अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी या कंपनीत गुंतवणूक केलेली आहे.
3/7
SME सेगमेंटमध्ये Indian Emulsifier या कंपनीचा आयपीओ येत आहे. 13 ते 16 मे पर्यंत या कंपनीच्या आयपीओत गुंतवणूक करता येईल. ही कंपनी आयपीओच्या मदतीने 42.39 कोटी रुपये उभे करणार आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 125-132 रुपये प्रतिशेअर आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये तुम्हाला 1000 शेअर मिळतील. 22 मे रोजी NSE SME वर ही कंपनी सूचिबद्ध होणार आहे.
4/7
Mandeep Auto Ind कंपनीचा आयपीओ येणार असून ही कंपनी 25.25 कोटी रुपये उभे करणार आहे. या आयपीओत 13-15 मे पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. या कंपनीच्या प्रत्येक शेअरचे मूल्य 67 रुपये असून 2000 शेअर्सचा लॉट तुम्हाला खरेदी करावा लागेल. येत्या 21 मे रोजी ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहे.
5/7
Veritaas Advertising या कंपनीचा आयपीओ 13 मे रोजी खुला होणार असून 15 मे पर्यंत त्यात गुंतवणूक करता येईल. या आयपीओचा किंमत पट्टा 109-114 रुपए प्रति शेअर असून एका लॉट मध्ये 1200 शेअर मिळतील.
6/7
Rulka Electrical Ltd ही कंपनी IPO च्या माध्यमातून 26.40 कोटी रुपये उभे करणार आहे. या कंपनीच्या आयपीओचा किंमत पट्टा 223-235 रुपए प्रति शेअर आहे. 16 ते 21 मे पर्यंत तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. तुम्हाला एका लॉटमध्ये 600 शेअर्स मिळतील. ही कंपनी NSE SME वर 24 मे रोजी लिस्ट होणार आहे.
7/7
Quest Laboratories Ltd या कंपनीचा आयपीओ 15 ते 17 मे पर्यंत गुंतवणुकीसाठी चालू राहील. ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 43.16 कोटी रुपये गोळा करणार आहे. या आयपीओचा किंमत पट्ट 93.97 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला असून एका लॉटमध्ये तुम्हाला 1200 शेअर्स मिळतील. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola