एक्स्प्लोर

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत संपली, घरांसाठी नोंदणी करणाऱ्यांसाठी आता 'या' चार तारखा महत्त्वाच्या

Mhada Lottery 2024 : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास विभागाच्या मुंबई मंडळाच्या वतीनं 2030 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या (Mhada) मुंबई मंडळाकडून 2030 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत 19 सप्टेंबरला संपली आहे.  म्हाडानं दिलेली मुदतवाढ संपली तेव्हा अनामत रकमेसह 113568 अर्जदारांनी अर्ज दाखल केले होते. तर, एकूण 134344 अर्जांची नोंदणी करण्यात आली होती.  आता घरांसाठी अर्ज करण्याची मुदत संपली असून म्हाडाकडून पुढील प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या प्रक्रियेत पुढील चार तारखा महत्त्वाच्या असणार आहेत. 

कोणत्या तारखा महत्त्वाच्या? 

म्हाडाकडे अर्ज सादर करण्याची मुदत 19 सप्टेंबरला संपली होती. घरांसाठी अर्ज करण्यास 15 दिवसांची मुदतवाढ दिल्यानं म्हाडाला फायदा झाला. आता म्हाडाकडून घरांसाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी पात्र अर्जदारांची यादी जाहीर केली जाईल. ही यादी जाहीर करण्याची तारीख 27 सप्टेंबर अशी आहे. तर, या यादी काही त्रुटी असल्यास त्यावर आक्षेप नोंदवण्याची मुदत 29 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. यानंतर म्हाडाकडून अंतिम यादी 3 ऑक्टोबरला जाहीर केली जाईल. म्हाडा प्रशासनानं लॉटरी काढण्यासाठी 8 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केलेली आहे. 

म्हाडाच्या सोडतीचा कार्यक्रम कुठे होणार?

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीचा कार्यक्रम मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यादिवशी ज्या अर्जदारांना घरं मिळाली आहेत त्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. तर, दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच 9 ऑक्टोबरपासून ज्या अर्जदारांना घर मिळालं नाही त्यांनी भरलेली अनामत रक्कम पुन्हा देण्यास सुरुवात होणार आहे. 

म्हाडाची घरं कोणत्या भागात? 

 मुंबई मंडळानं बांधकाम सुरु असलेल्या प्रकल्पातील काही घरं, विकासकांकडून मिळालेली काही घरं आणि म्हाडाच्या मागील लॉटरीतील शिल्लक असलेली विखुरलेली घरं अशा एकूण  2030 घरांसाठी लॉटरी काढली होती. ही घरं म्हाडानं मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड इत्यादी ठिकाणच्या गृहनिर्माण प्रकल्पामधील होती.  यामध्ये बांधकाम सुरु असलेल्या प्रकल्पातील 1327, विकासकांकडून मिळालेल्या 370 घरांच्या आणि विखुरलेल्या ठिकाणांवरील 333 घरांचा समावेश होता. 

दरम्यान, म्हाडाच्या मुंबई मंडळानं मुदतवाढ देण्याचा आणि विकासकांनी दिलेल्या घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय गेमचेंजर ठरला. मुंबईतील घरांसाठी अर्ज करण्यास 15 दिवसांची मुदतवाढ दिली होती. तर, विकासकांनी दिलेल्या 370 घरांची किंमत 12 लाख ते 75 लाख रुपयांनी कमी करण्यात आली होती. 

इतर बातम्या : 

Mhada Lottery 2024 : म्हाडाचा मुदतवाढीचा निर्णय गेमचेंजर ठरला, मुंबईतील घरांसाठी लाखांहून अधिक अर्ज, जाणून घ्या आकडेवारी

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Prices News : साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Embed widget