एक्स्प्लोर

Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सीवर सरकार लवकरच निर्णय घेणार; पंतप्रधानांच्या उपस्थितीत बैठक

Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सीच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पाडल्याचे वृत्त आहे.

नवी दिल्ली: देशभरात क्रिप्टोकरन्सीकडे अनेकांचा ओढा वाढला असून गुंतवणुकीचे प्रमाणही वाढले आहे. सरकारकडूनही क्रिप्टोकरन्सीच्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवले जात आहे. क्रिप्टो ट्रेडिंगवर सरकार लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. क्रिप्टोकरन्सी आणि संबंधित मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिप्टोकरन्सीबाबत झालेली ही बैठक अधिक व्यापक होती. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. आरबीआय, अर्थ मंत्रालय, गृह मंत्रालयानेदेखील देशातील आणि जगातील तज्ज्ञांसोबत या मुद्यावर चर्चा केली आहे. जगभरातील क्रिप्टोकरन्सीबाबत अभ्यास करण्यात आला आहे. त्यानंतर पंतप्रधानांनी ही बैठक बोलवली होती. 

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर लगाम

सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली. त्याशिवाय. अनियमित क्रिप्टो बाजारातून मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत मिळू नये याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याच्या मुद्यावर चर्चा झाली. क्रिप्टो ही विकसित तंत्रज्ञान असून सरकारचे यावर लक्ष राहणार  असून सक्रिय पावले उचलण्यात येणार आहेत. 

क्रिप्टोकरन्सी ही कोणत्याही एका देशाची सीमा अथवा नागरिकांपर्यंत मर्यादित नाही. त्यामुळे हा मुद्दा वेगवेगळे देश आणि नागरिकांशी संबंधित आहे. त्यामुळे या बैठकीत जागतिक पातळीवर भागिदारी आणि रणनीतीची आवश्यकता असणार आहे. 

दरम्यान, या आधीच्या वृत्तानुसार भारत सरकार फेब्रुवारीमध्ये आपल्या आगामी अर्थसंकल्पात क्रिप्टोकरन्सीचे नियमन करण्याची शक्यता आहे, पूर्णपणे बंदी घालण्याच्या आपल्या आधीच्या दृष्टिकोनापासून दूर जात हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सरकार क्रिप्टोकरन्सीला मालमत्तेचा वर्ग म्हणून वस्तूंप्रमाणेच, व्यवहार आणि नफ्यावर योग्य कर आकारणी करून नियमन करण्याचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे.  

संबंधित वृत्त: 
India on Cryptocurrency: पुढील अर्थसंकल्पात क्रिप्टोचे नियमन करणार भारत सरकार, बंदीचा विचार नाही : रिपोर्ट

बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमुळे आर्थिक संकट येण्याची शक्यता, बँक ऑफ इंग्लंडच्या डेप्युटी गव्हर्नरांनी व्यक्त केली भीती

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO: जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
Donald Trump : रशियासोबत डिझेल खरेदीची डील करताच ट्रम्प यांचा यूटर्न, भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, अमेरिकेचा मोठा निर्णय
भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा यूटर्न, अमेरिकेचा मोठा निर्णय 

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget