RBI Guidelines to Banks : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने म्हटले आहे की, ग्राहकांसाठी सतत कार्यरत असलेल्या बॅंका डिजिटल बँकिंग युनिट्स उघडू शकतात. ही युनिट्स दोन प्रकारची असतील. जिथे प्रथम ग्राहक सर्व सेवा स्वत: घेतील, दुसऱ्यामध्ये ग्राहकांना मदत केली जाईल. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकारने सर्वसाधारण अर्थसंकल्पात 75 जिल्ह्यांमध्ये अशा किमान 75 युनिट्सची स्थापना करण्याची घोषणा केली होती.
या युनिट्समध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध असतील?
डिजिटल बँकिंग युनिट्स (DBUs) च्या स्थापना संदर्भात RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, या युनिट्सद्वारे प्रदान केलेल्या सेवांमध्ये खाते उघडणे, रोख पैसे काढणे, ठेवी, KYC अपडेट, कर्ज आणि तक्रार नोंदणी यांचा समावेश आहे. बँकांमध्ये उघडलेल्या डिजिटल बँकिंग युनिट्समध्ये अशाप्रकारच्या सेवांचा समावेश असल्याने ग्राहकांना याचा निश्चितच फायदा होणार आहे.
पूर्णपणे डिजिटल स्वरूपात सेवा उपलब्ध
मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की, डिजिटल बँकिंग उत्पादने आणि सेवा संपूर्णपणे डिजिटल आहेत, जेथे ग्राहक स्वत: उत्पादने किंवा सेवांचा लाभ घेऊ शकतात.
या बँकांना परवानगी
मार्गदर्शक तत्त्वांनुसार, डिजिटल बँकिंगचा अनुभव असलेल्या अनुसूचित व्यावसायिक बँकांना RBI ची परवानगी न घेता टियर-1 ते टियर-VI केंद्रांमध्ये (मोठ्या केंद्रांपासून लहान केंद्रांपर्यंत) डिजिटल बँकिंग युनिट्स उघडण्याची परवानगी आहे.
महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय काय पावलं उचलतं?
रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस असून आरबीआयकडून आज सकाळी 10 वाजता क्रेडिट पॉलिसीची घोषणा होणार आहे, व्याजाचे दर जैसे थे ठेवले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत, विकासाचा वेग राखण्यासाठी सोबतच महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय काय पावलं उचलतं याकडे सर्वांचे लक्ष लागलंय, रेपो रेट वाढविणार नसल्यानं व्याजदरात बदल होण्याची शक्यताही कमी आहे, त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
- Reserve Bank foundation day : नोटा छपाईचा अधिकार, बँकांची बँक, देशाची आर्थिक पत सांभाळणे, रिझर्व्ह बँकेच्या कामकाजाचा आढावा
- भारताची चालू खात्यात तूट 9 वर्षातील सर्वोच्च पातळीवर, 23 अब्ज झाल्याची आरबीआयची माहिती
- बँकिंग घोटाळ्यांमुळं सात वर्षात दररोज 100 कोटींचं नुकसान,