Rs 100 crore fraud Every Day :  गेल्या सात वर्षात भारतात झालेल्या बँक घोटाळे आणि फसवणूकीतून मोठे आणि गंभीर परिणाम भारताला सध्या भोगावे लागत आहेत. भारतातील बँकांची शिखर बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) याबाबत माहिती दिली आहे. या घोटाळ्यांमुळं भारताचं दररोज तब्बल 100 कोटींचं नुकासान होतं आहे, असं आरबीआयनं म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बँक घोटाळे आणि फसणूकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.


आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, बँक घोटाळे, फसवणूकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, देशाची राजधानी दिल्ली यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. घोटाळे आणि फसवणूकीवर आळा घालण्यासाठी अनेक कठोर नियम लावण्यात आले आहेत. मात्र, याचा काहीही फरक पडत नसल्याचे दिसतेय. या बँक घोटाळा आणि फसवणूकीतून फक्त बँकाचेच नुकसान होत नाही. तर सर्वसामान्यांनाही फटका बसत आहे. आरबीआयच्या रिपोर्ट्सनुसार, मागील सात वर्षांत बँकिंग घोटाळ्यामुळे भारताला दररोज 100 कोटी रुपयांचा फटका बसत आहे. प्रत्येकवर्षी घोटाळ्यांच्या संख्येत कपात होत आहे. सर्वात आधिक बँक घोटाळे महाराष्ट्रात होत आहेत. तर दिल्लीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात होणाऱ्या घोटाळ्यापैकी 50 टक्के घोटाळे महाराष्ट्रात झाले आहे.  


पाच राज्यात 83 टक्के घोटाळे - 
महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये सर्वाधिक बँक घोटाळे झाले आहेत. या पाच राज्यात मागील सात वर्षात 83 टक्के बँक घोटाळे झाल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. या पाच राज्यात दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बँक घोटाळे झाले आहेत. 


2.5 लाख कोटींची फसवणूक - 
आरबीआयने दिलेल्या आकड्यानुसार, एक एप्रिल 2015 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत देशात 2.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक झाली आहे.  आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये 67,760 कोटी रुपयांची फसवणूक समोर आली.  2016-17 मध्ये यामध्ये घट पाहायला मिळाली. या काळात 59,966.4 कोटींची फसवणूक जाली. 2019-20 काळात 27,698.4 कोटी रुपये आणि 2020-21 मध्ये 10,699.9 कोटी रुपयांची फसवणूक झाली. 
आर्थिक वर्षा 2021-22 च्या पहिल्या 9 महिन्यात (एप्रिल-डिसेंबर) मध्ये 647.9 कोटींची फसवणूक झाली होती.