एक्स्प्लोर

Electricity Rate Cut : गुड न्यूज, महावितरणचा पहिल्यांदा वीज दर कपातीचा प्रस्ताव, नवे दर कधीपासून लागू होणार? 2 कोटी 80 लाख ग्राहकांना फायदा

MSEDCL : महावितरणनं येत्या पाच वर्षांसाठी वीज दर कपातीचा प्रस्ताव दिला आहे. महावितरणच्या इतिहासात पहिल्यांदा वीज दर कपात प्रस्तावित आहे.

मुंबई: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं पहिल्यांदा दर कपातीचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावात साधारणपणे 1 ते 15 टक्के कपात अपेक्षित आहे. या निर्णयाचा लाभ महाराष्ट्रातील 2 कोटी वीज ग्राहकांना होणार  आहे. महावितरणनं यासंदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र वीज नियामक आयोगाला दिला आहे. 2025-26 ते 2029-30  या कालावधीमध्ये 12 टक्के ते 23 टक्के दर कपातीचा प्रस्ताव आहे. 

2025-26 या वर्षामध्ये जे घरगुती वीज ग्राहक 100 यूनिट पेक्षा कमी वीज वापरतात त्या मध्ये 15 टक्के कपातीचा प्रस्ताव आहे. यामध्ये पुढं 2027-28 मध्ये 19 टक्के तर 2028-29 मध्ये 25 टक्क्यांपर्यंत घट अपेक्षित आहे. या ग्राहकांना सध्या एका यूनिटला 5.14 रुपये द्यावे लागतात 2029-30 मध्ये त्यांना एक यूनिट वीज 2.20 रुपयांना मिळेल.   

जे ग्राहक 101-300  यूनिट वीज वापरतात. घरगुती वीज ग्राहकांची संख्या यामध्ये मोठी आहे. सध्या या वीजग्राहकांना एका यूनिटला 11.06 रुपये द्यावे लागतात, दरकपातीच्या प्रस्तावानंतर त्यांना 2030 मध्ये एक यूनिट वीज 9.30 रुपयांना उपलब्ध होईल.    

जे ग्राहक 301 -500 यूनिट वीज प्रतिमहिना वापरतात त्यांना एका यूनिटला 15.60 रुपये द्यावे लागतात. 2029-30 मध्ये त्याचा दर 15.29 रुपये प्रति यूनिट असेल. 500 यूनिट पेक्षा जे अधिक वीज वापरतात त्यांच्यासाठीचा सध्याचा प्रति यूनिट दर 17.76 रुपये आहे तो पाच वर्षानंतर 17.24 रुपये असेल. 

महावितरणचे महाराष्ट्रात एकूण 2 कोटी 80 लाख वीज ग्राहक आहेत. यामध्ये भांडूप, मुलूंड, ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि उर्वरित महाराष्ट्राचा समावेश आहे. यामध्ये 2 कोटी ग्राहक घरगुती वीज ग्राहक आहेत. 

महाराष्ट्रातून उद्योगांनी बाहेर जावू नये यासाठी औद्योगिक ग्राहकांना देखील दिलासा देण्यासंदर्भात प्रस्ताव आहे. साधारणपणे त्यांच्या वीज बिलात तीन महिन्यात 3 टक्क्यांच्या कपातीचा प्रस्ताव आहे. तर, पाच वर्षात 11 टक्क्यांची कपात अपेक्षित आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या वीजेच्या दरात मात्र वाढ प्रस्तावित आहे. सध्या त्यासाठी प्रतियूनिट दर 7.30 रुपये आकारला जातो. त्यात 35 टक्क्यांची वाढ अपेक्षित असून एका यूनिटचा दर 9.86 रुपये असू शकतो. 

नवे दर कधीपासून लागू होणार?

महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी महावितरणनं इतिहासात पहिल्यांदा वीज दर कपातीचा  प्रस्ताव दिला आहे. नवीकरणीयक्षम ऊर्जा प्रकल्पातून किफायतशीर दरात वीज उपलब्ध होणार असल्यानं आणि कृषीपंपासाठी लागणार्‍या वीजेचा वापर सौर कृषीपंपांसाठी केल्यानं कमी झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला.लोकेश चंद्रा यांनी 2030 पर्यंत वीजनिर्मिती क्षमता 81000 मेगा वॅटपर्यंत नेण्याचा विचार असल्याचं म्हटलं.  

1 एप्रिल पासून वीज दर कपातीचा निर्णय लागू होऊ शकतो. वीज बिलामध्ये पुढील पाच वर्ष 12 ते 23 टक्के कपात होऊ शकते, असं महावितरणचे संचालकविश्वास पाठक यांनी म्हटलं. मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी फीडर प्रकल्प 2.0  यामधील प्रकल्प येत्या दोन वर्षात सक्रिय होतील. या प्रकल्पातून 16000 मेगावॅट वीज निर्मितीचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं.  त्याचा फायदा  घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांना होईल, असं पाठक म्हणाले. 

इतर बातम्या :

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Vidyadhar Joshi: Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
Kolhapur Crime: कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
Moshi Building Collapse: लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
Girija Raut : विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत, गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
Embed widget