एक्स्प्लोर

DA Hike: शिंदे सरकारचे गिफ्ट! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

DA Hike In Maharashtra: राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

DA Hike:  केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारनेदेखील आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ (DA Hike) केली आहे. राज्य सरकारने चार टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवला आहे. महागाई भत्याचा दर 38 टक्क्यावरून 42 टक्के करण्यात आला आहे.  हा महागाई भत्ता 1 जानेवारी ते 31 मे दरम्यानचा महागाई भत्ता जूनच्या वेतनामध्ये रोखीने दिला जाणार आहे. 

मागील अनेक दिवसांपासून महागाई भत्ता वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढवला जातो. आज अर्थ विभागाने शासन निर्णय काढून महागाई भत्ता वाढवण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरुन 42 टक्के करण्यात आलेला आहे.

केंद्राने 3 एप्रिल 2023 रोजी महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4 टक्के वाढ केली होती. डीए आणि डीआरएमध्ये ही वाढ जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आली. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरुन 42 टक्के झाला आहे.


जुलै 2021 मध्ये दीर्घ कालावधीनंतर केंद्र सरकारने (Central Government) केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 17 टक्क्यांवरुन 28 टक्के केला होता. यानंतर, ऑक्टोबर 2021 मध्ये, आणखी 3 टक्के वाढ देऊन तो 31 टक्के करण्यात आला. मग सरकारने मार्च 2022 मध्ये कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये तीन टक्क्यांनी वाढ केली होती. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्क्यांवरुन 34 टक्के करण्यात आला आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात 38 टक्क्यावरुन 42 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 

तमिळनाडूमध्ये किती वाढ झाली?

तमिळनाडूच्या राज्यसरकारने महागाई भत्यात चार टक्क्यांनी वाढ केली आहे. म्हणजेच आता तमिळनाडूनत महागाई भत्ता हा 38 टक्क्यावरुन 42 टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे सोळा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लाभ होणार आहे. हे नवे दर एक एप्रिलपासून लागू झाले आहेत. 

हिमाचल, आसाम आणि राजस्थानमध्ये देखील वाढला महागाई भत्ता?
 

हिमाचल प्रदेशात महागाई भत्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तर राजस्थानमध्ये चार टक्क्यांनी महागाई भत्यात वाढ करण्यात आली आहे. तर आसामध्ये चार टक्के सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ करण्यात आली आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये ही 42 टक्के महागाई भत्ता

उत्तर प्रदेशातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात देखील वाढ करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात  महागाई भत्ता 42 टक्के झाला आहे. या निर्णयामुळे उत्तर प्रदेशात 16.35 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 11 लाख पेन्शनधारकांना लाभ होणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Embed widget