एक्स्प्लोर

गॅस सिलेंडर दुर्घटना झाल्यास कसा कराल विमा दावा, जाणून घ्या प्रक्रिया

Gas Cylinder Blast Claim: गॅस सिलेंडर स्फोट होणे ही दुर्मिळ घटना असली तरी अशी घटना झाल्यास आणि जीवितहानी झाल्यास विम्याचा दावा करता येऊ शकतो.

Gas Cylinder Blast Claim: गॅस सिलेंडर स्फोट होऊन जीवितहानी झाल्यानंतर इंधन कंपन्यांकडून विमा दिला जातो. गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन अपघात होऊ नये यासाठी इंधन कंपन्या सुरक्षितेच्या दृष्टीने 100 टक्के प्रयत्न करतात. देशामध्ये सिलेंडर सुरक्षितेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असणारी सर्वोच्च मानके पूर्ण करण्यावर भर दिला जातो. 

एलपीजी गॅस विमा पॉलिसी ही सामुहिक विम्यासारखी (ग्रुप इन्शूरन्स) आहे. हा विमा सर्व इंधन कंपन्या घेतात. भारतात सर्व डिलर्सकडूनदेखील ग्रुप इन्शूरन्स घेतला जातो. हे सर्व एलपीजी ग्राहकांना लागू होते. देशातील बहुतांशी लोकांना याबाबतची माहिती नसते. दुर्घटनेनंतरच्या दु:खात असल्याने लोकांना याचा विसर पडतो. त्यातून लोकांकडून विमा दावा केला जात नाही. मात्र, आपण या नियमांबाबत जागरुक राहणे आवश्यक आहे. 

गॅस सिलेंडर दुर्घटना झाल्यास विम्याचा दावा कसा कराल?

गॅस सिलेंडर दुर्घटना झाल्यानंतर लवकरात लवकर गॅस वितरकाला शक्य तेवढ्या लवकर लिखित स्वरुपात माहिती द्यावी. 

पीडित कुटुंबाने माहिती दिल्यानंतर गॅस वितरकाने संबंधित इंधन कंपनी, विमा कंपनीला माहिती देणे आवश्यक आहे. 

गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे झालेल्या दुर्घटनेवर विमा दावा करणाऱ्या पीडितांच्या कुटुंबाला विमा दावा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित इंधन कंपनी ग्राहकांची, नातेवाईकांची मदत करते. 

एलपीजी वितरकांकडे एलपीजी अपघातातील नुकसान भरपाईसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सर्व नोंदणीकृत एलपीजी ग्राहकांना विमा संरक्षण दिले आहे. नुकसानभरपाईबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा जवळच्या शाखेशी अथवा कार्यालयाशी संपर्क साधा.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) सारख्या इंधन कंपन्यांनी पीडितांना दिलासा देण्यासाठी विमा काढतात. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Post Office RD Scheme : दरमहा फक्त 4000 रुपयांची पोस्टाची RD ठरेल गेमचेंजर, 5 वर्षात किती फंड जमणार, कर्ज काढण्याची सुविधा उपलब्ध, जाणून घ्या
दरमहा फक्त 4000 रुपयांची पोस्टाची RD ठरेल गेमचेंजर, 5 वर्षात किती फंड जमणार, आर्थिक संकटात कर्ज देखील मिळतं...
EPFO : केंद्र सरकारकडून EPFO च्या वेतनमर्यादेत 25 हजारांपर्यंत वाढ, पगार आणि पेन्शनवर नेमका काय परिणाम होणार?
केंद्र सरकारकडून EPFO च्या वेतनमर्यादेत 25 हजारांपर्यंत वाढ,पगार आणि पेन्शनवर नेमका काय परिणाम होणार?
Gold Silver Rate: सोन्याचा भाव घसरला, चांदीही झाली स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
सोन्याचा भाव घसरला, चांदीही झाली स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
India Gold Imports : सोन्याचे भाव पुन्हा वाढणार? काय आहे कारण?; दिग्गज बँकर उदय कोटक यांनी वर्तवला गंभीर इशारा
सोन्याचे भाव पुन्हा वाढणार? काय आहे कारण?; दिग्गज बँकर उदय कोटक यांनी वर्तवला गंभीर इशारा

व्हिडीओ

Maharashtra Dushkal : दुष्काळ जाहीर होणार, मदत कधी मिळणार Special Report
JainMuni KabootarKhana : पुन्हा धडपड कबुतरांसाठी फडफड Special Report
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK Zaheer Khan: चेन्नई सुपर किंग्जचा नवा डाव, IPL 2027 साठी झहीर खानवर सोपवली मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी 
स्टीफन फ्लेमिंगनं साथ सोडली, चेन्नईनं नवा डाव टाकला, झहीर खानवर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी
Raju Shetti :  केंद्र सरकार टप्प्यात आलंय, दिवाळीला साखर हवी असेल तर 'या' तीन मागण्या मान्य कराव्या लागणार : राजू शेट्टी 
केंद्रीय अन्नपुरवठा मंत्र्याच्या हुबळी गावात शेतकऱ्यांचे आंदोलन, राजू शेट्टी यांची घोषणा     
महसूलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात ! केंद्राकडून प्रत्येक कार्यालयाला 50 लाखांचे अनुदान
महसूलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात ! केंद्राकडून प्रत्येक कार्यालयाला 50 लाखांचे अनुदान
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
Maharashtra Live blog updates: महायुतीत अंतर्गत कलह चव्हाट्यावर, आमदार राजू कारेमोरे यांच्या भूमिकेवर भाजप आक्रमक
Maharashtra Live blog updates: महायुतीत अंतर्गत कलह चव्हाट्यावर, आमदार राजू कारेमोरे यांच्या भूमिकेवर भाजप आक्रमक
Marathi vs Jain Mira Bhayandar: पर्युषण काळात शाळेत मेथीची भाजी नेल्याने विद्यार्थ्याला दंड, मीरा-भाईंदरमधील शाळेला शिक्षण विभागाची नोटीस
पर्युषण काळात शाळेत मेथीची भाजी नेल्याने विद्यार्थ्याला दंड, मीरा-भाईंदरमधील शाळेला शिक्षण विभागाची नोटीस
Rahul Gandhi Phone Call Rahul Bondre : आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही कुठं जाऊ नका, पराभवानंतर विजय होतो, राहुल गांधी यांचा राहुल बोंद्रेंना फोन; राहुल बोंद्रेंचा काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय
राहुल गांधी यांच्यासोबत बोलताना राहुल बोंद्रे भावूक, काँग्रेसमध्येच थांबून लढण्याचा राहुल बोंद्रे यांचा शब्द
भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जेवणासाठी फ्री स्टाईल; पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर एकच घाई, कॉलर पकडून हाणामारी
भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जेवणासाठी फ्री स्टाईल; पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर एकच घाई, कॉलर पकडून हाणामारी
Embed widget