LPG Gas Cylinder Price:  भारतीय इंधन कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरचा दर (LPG Price) जाहीर करतात.  मागील काही महिन्यांपासून इंधन कंपन्यांकडून व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी गॅस दरात कपात करण्यात येत आहे. आजही इंधन कंपन्यांकडून एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाहीर करण्यात आले आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील एलपीजीचे दर जाहीर करण्यात आले आहेत. आज इंधन कंपन्यांकडून एलपीजी गॅसच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही.


घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नसल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, तरीदेखील घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांना एलपीजी गॅस सिलेंडरसाठी एक हजारांहून अधिक रुपये मोजावे लागत आहेत. वाढत्या महागाईच्या काळात दिलासा देण्यासाठी एलपीजीचे दर कमी करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, सरकारकडून, इंधन कंपन्यांनी कोणताही दिलासा दिला नाही. 


देशातील प्रमुख शहरांमध्ये घरगुती गॅसची किंमत किती?


देशाची राजधानी दिल्लीत 14.2 किलो एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 1053 रुपये इतकी आहे. तर, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 14.2 किलो एलपीजी गॅस सिलिंडरसाठी 1052.50 रुपये मोजावे लागत आहेत. कोलकातामध्ये 14.2 किलो LPG गॅस सिलिंडरची किंमत 1079 रुपये असून चेन्नईमध्ये 14.2 किलो एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 1068.50 रुपये आहे.


व्यायावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजीचे दर किती?


व्यायावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडर 19 किलोचा असतो. दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर 1744 रुपयांना उपलब्ध आहे. कोलकाता येथे व्यावसायिक LPG गॅस सिलिंडर 1846 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर 1696 रुपयांना उपलब्ध आहे. चेन्नईमध्ये व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरसाठी 1893 रुपये मोजावे लागतात. 


नोव्हेंबर महिन्यात सिलेंडर दरात कपात?


नोव्हेंबर महिन्यात व्यावसायिक वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडर दरात 115.50  रुपयांची कपात करण्यात आली होती. तर, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. सहा जुलैपासून घरगुती सिलेंडरच्या किंमती स्थिर आहेत. यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 25.5 रुपयांची कपात करण्यात आली होती. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: