Fiscal Deficit News: एप्रिल-ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारची वित्तीय तूट 7.58 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ही तूट वर्षाच्या उद्दिष्टाच्या 45.6 टक्के आहे. कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्सने जारी केलेल्या आकडेवारीवरून देशाची वित्तीय तूट वाढल्याचं पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे मुख्य क्षेत्राचा विकास दर 20 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे आहे. केंद्र सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 16.61 लाख कोटी रुपये किंवा जीडीपीच्या 6.4 टक्के वित्तीय तुटीचे लक्ष्य ठेवले आहे. वित्तीय तूट सरकारचा खर्च आणि महसूल यांच्यातील तफावत दर्शवते.
निव्वळ कर प्राप्ती 11.71 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे, तर एकूण खर्चही 21.44 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसून येते. गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान वित्तीय तूट FY22 च्या उद्दिष्टाच्या 36.3% होती. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत वित्तीय तूट वाढून 6.20 लाख कोटी झाली होती. जी वार्षिक अंदाजाच्या 37.3% होते.
सरकारने लक्ष्य 6.4% ठेवले होते
या वर्षी फेब्रुवारीमध्ये वार्षिक अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2023 साठी जीडीपीच्या 6.4% वित्तीय तुटीचे लक्ष्य ठेवले होते. तर गेल्या आर्थिक वर्षात हे लक्ष्य 6.7 टक्के होते.
वित्तीय तूट म्हणजे काय?
वित्तीय तूट याला इंग्रजीत Fiscal Deficit म्हणतात. वित्तीय तूट नावाप्रमाणेच सरकारच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्चाचे सूचक आहे. सरकार विविध प्रकारचे कर लादून पैसा गोळा करते, यालाच सरकारचे उत्पन्न म्हणतात. त्यानंतर हाच पैसा सरकार विविध जनहिताच्या कामात गुंतवते. जर खर्च जास्त असेल तर त्याला वित्तीय तूट असं म्हटलं जातं.
दरम्यान उत्पन्नापेक्षा खर्च जास्त हे अधिशेषाच्या विरुद्ध आहे, कारण जेव्हा सरकारचे उत्पन्न त्याच्या खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्याला नफा किंवा अधिशेष म्हणतात. सरकारच्या उत्पन्नात किंवा उत्पन्नात कर्जाची भर पडत नाही.
कोअर क्षेत्रातील उत्पादनात घट
मुख्य क्षेत्रातील उद्योगांची वाढ ऑक्टोबरमध्ये 0.1 टक्क्यांवर आली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात 8.7 टक्के होती. मंत्रालयाने जुलै 2022 साठी आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकाचा अंतिम विकास दर 4.5 टक्क्यांच्या तात्पुरत्या स्तरावरून 4.8 टक्क्यांवर सुधारित केला.
सप्टेंबरच्या सुरुवातीला अर्थव्यवस्थेच्या आठ पायाभूत सुविधा क्षेत्रातील वाढ मागील दोन महिन्यांतील घसरणीनंतर तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या सरकारी आकडेवारीनुसार कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, सिमेंट, पोलाद आणि वीज या आठ क्षेत्रांमधील वाढ सप्टेंबरमध्ये 7.9 टक्क्यांवर पोहोचली आहे.
ऑगस्टमध्ये तो 4.1 टक्क्यांच्या सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला होता. सप्टेंबरमध्ये कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू वगळता सर्व क्षेत्रांनी वाढ नोंदवली. विशेष म्हणजे, कोळसा, खते, सिमेंट आणि वीज या महिन्यात उत्पादनात दुहेरी अंकी वाढ नोंदवली गेली. आठ प्रमुख उद्योगांचे औद्योगिक उत्पादन निर्देशांकात 40.27 टक्के आहे.
ही बातमी देखील वाचा