LPG Gas Cylinder: होळीच्या आधी तुम्ही स्वस्तात गॅस सिलिंडर बुकिंग करणार असाल तर एक दिलासादायक बातमी आहे. तुम्ही फक्त 634 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर बुक करू शकता. जाणून घेऊयात याबाबत...
सरकारी इंधन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने ग्राहकांसाठी स्वस्त सिलिंडरची योजना आणली आहे. महागाईच्या काळात तुम्ही फक्त 634 रुपयांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर खरेदी करू शकता.
वजनात हलका असणार सिलिंडर
या सिलिंडरचे नाव कम्पोजिट सिलिंडर आहे. हा 14 किलोच्या सिलिंडरच्या वजनाच्या तुलनेत हलका आहे. हा सिलिंडर एका हातानेदेखील उचलू शकतो. सामान्यपणे घरी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरच्या तुलनेत हा सिलिंडर 50 टक्क्यांनी हलका आहे.
ग्राहकांना मिळणार 10 किलो गॅस
कम्पोझिट सिलिंडर वजनाने हलका आहे. ग्राहकांना या सिलिंडरमध्ये 10 किलो एलपीजी गॅस मिळतो. त्यामुळे या सिलिंडरची किंमत कमी आहे. हे सिलिंडर पारदर्शी आहेत.
634 रुपयांमध्ये मिळणार सिलिंडर
हा सिलिंडर तुम्ही फक्त 633.5 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे हा सिलिंडर नेता येऊ शकतो. तुमचे कुटुंब छोटे असल्यास हा चांगला पर्याय आहे.
किती गॅस शिल्लक हेदेखील कळणार
हा नवा सिलिंडर गंजणार नाही. त्याशिवाय याचा स्फोटदेखील होणार नाही. हा सिलिंडर पारदर्शी असून ग्राहकांना किती गॅस शिल्लक आहे, हेदेखील समजणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- UPI Payment : UPI पेमेंट्सचा वापर करताय, मग 'या' गोष्टीकडे द्या लक्ष
- Russia-Ukraine war : युद्ध संकटामुळे बाजारात 77,000 हजार कोटी रुपयांचे आयपीओ अडकले
- केंद्र सरकारचा सामान्यांना मोठा झटका, आर्थिक वर्ष-22 साठी EPFO व्याजदरात कपात; 40 वर्षात पहिल्यांदाच सर्वात कमी व्याजदर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha