UPI Payment : सध्या अनेकांकडून डिजीटल पेमेंटचा वापर वाढत चालला आहे. ऑनलाइन शॉपिंग आणि इतर किरकोळ व्यवहार करतानादेखील अनेकांकडून युपीआय पेमेंट अथवा नेट बँकिंगचा वापर करण्यात येत आहे. ऑनलाइन पेमेंट, नेट बँकिंगचा वापर करताना काही काळजी आवश्यक आहे.


UPI पेमेंटचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. सायबर गुन्हेगारांकडून लोकांची फसवणूक करण्यात येत आहे. मागील काही काळात भारतातील ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. 


कोणत्याही लिंकवर पिन क्रमांक नमूद करणे टाळा


ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांकडून काही खोट्या ऑफर्स दिल्या जातात. लोकांना वेगवेगळ्या ऑफर्सचा लोभ दाखवत एक लिंक मेसेजद्वारे शेअर करतात. या लिंकच्या माध्यमातून लॉटरी अथवा कॅशबॅक पाठवण्यासाठी तुम्हाला पिन क्रमांकाची मागणी करतात. अशावेळी तुम्ही त्यांच्या सूचनांचे पालन करत पिन क्रमांक नमूद केल्यास तुमच्या खात्यातील सर्व पैशांवर डल्ला मारतात. त्यामुळे असे मेसेज डिलीट करावेत आणि कोणालाही आपला पिन क्रमांक सांगू नये. 


पासवर्ड चांगला ठेवावा


UPI सेवेसाठी नोंदणी करताना पासवर्ड अधिक सुरक्षित असेल याची काळजी घ्यावी. पासवर्ड तयार करताना जन्मतारखेचा अनेकजण वापर करतात. असे पासवर्ड सहजपणे ओळखता येऊ शकतात. पासवर्डमध्ये कॅपिटल अक्षर, विशेष चिन्ह आणि क्रमांकाची समावेश असावा. तुमचा पासवर्ड सहजपणे ओळखता येईल असा पासवर्ड ठेवू नये. 


फसवणूक करणाऱ्या कॉलपासून सावध रहा


सायबर गुन्हेगार तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्सच्या नावाने कॉल करतात. यानंतर, तो त्यांच्याकडून त्यांचे बँकिंग तपशील, UPI पिन इत्यादी माहिती घेतात. त्यानंतर तुमचे खाते रिकामे करतात. 


वेळो-वेळी अॅप अपडेट करा


युपीआय पेमेंट अॅप वेळोवेळी अपडेट करत राहा. सायबर सुरक्षा वाढवण्यासाठी कंपन्यांकडून फिचर्स अपडेट केले जातात. त्यामुळे युपीआय अॅप नेहमी अपडेट ठेवा. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha