EPFO News: केंद्र सरकारने (Central Government) सर्वसामान्यांना मोठा झटका देत भविष्य निर्वाह निधीवर मिळत असलेल्या व्याजदरात मोठी कपात केली आहे. आता ईपीएफओ अंतर्गत उपलब्ध पीएफचा व्याजदर 8.50 टक्क्यांवरून 8.10 टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
ईपीएफओने आर्थिक वर्ष 2022 साठी व्याजदर 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्के केला आहे. गुवाहाटी येथे सुरू असलेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत 2022 या आर्थिक वर्षासाठी EPFO चे व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पीएफवरील व्याजदर 8.50 टक्क्यांवरून 8.10 टक्के करण्यात आला आहे. ईपीएफओच्या ग्राहकांसाठी हा मोठा धक्का आहे.
1977-87 पासून सर्वांत कमी व्याजदर
चालू आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने 1977-78 नंतर ईपीएफवर सर्वात कमी व्याजदर ठेवले आहेत. 1977-78 मध्ये भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर 8 टक्के ठेवण्यात आला होता. चालू आर्थिक वर्षासाठी गेल्या 40 वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. या व्याजदरात कपात केल्यानंतर पीएफ सदस्यांना त्यांच्या पीएफवर कमी व्याज मिळेल.
EPF वर मिळत असलेले व्याजदर (वर्षानुसार)
आर्थिक वर्ष 15 - 8.75 टक्के
आर्थिक वर्ष 16 - 8.80 टक्के
आर्थिक वर्ष 17 - 8.65% टक्के
आर्थिक वर्ष 18 - 8.55 टक्के
आर्थिक वर्ष 19 - 8.65 टक्के
आर्थिक वर्ष 20 - 8.5 टक्के
आर्थिक वर्ष 21- 8.5% टक्के
आर्थिक वर्ष 22 - 8.10 टक्के
6 कोटी लोकांना बसणार धक्का
सरकारच्या या निर्णयामुळे पीएफ खात्यावर व्याज घेणाऱ्या ईपीएफओ सदस्यांना आता कमी व्याज मिळणार आहे. याचाच परिणाम आता सामान्य नागरिकांवर होणार असून त्यांच्या उत्पन्नात घट होणार आहे. व्याजदर कमी झाल्याने याचा फटका देशातील 6 कोटी नागरिकांना बसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे व्याजदर कमी करण्याची शिफारस अर्थ मंत्रालयाकडून करण्यात आली होती. या शिफारशीला ईपीएफओने मान्यता दिली होती. त्यानंतर व्याजदर 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्के करण्यात आले.
संबंधित बातम्या :
EPFO Facility : पीएफ खात्यातूनही विमा पॉलिसीचा हप्ता भरता येतो, काय आहे EPFO ची 'ही' सुविधा, जाणून घ्या
EPFO विभागाचा पीएफ खातेदारांना मोठा दिलासा, घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
EPFO News : 23.34 कोटी ईपीएफओ खातेधारकांसाठी खुशखबर; सरकारकडून 2020-21 वर्षाचं व्याज जमा