टोरॅन्टो : गेल्या वर्षी कॅनडात (Canada Gold Theft) जगाला हादरवून सोडणारी चोरीची घटना घडली होती. गेल्या वर्षभरापासून कॅनडाचे पोलीस (Canada Police) या चोरीचा छडा लावण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरलेल्या या चोरीत पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी या घटनेत आतापर्यंत एकूण सहा जाणांना अटक केले असून यात दोन भारतीय वंशाच्या नागरिकांचाही समावेश आहे. या चोरीत चोरट्यांनी एकूण 400 किलोंचं सोन चोरून नेलं होतं. 


चोरीसाठी मनी हाईस्ट बेव सिरीजची प्रेरणा 


कॅनडात गेल्या वर्षी सोने आणि विदेश चलनाची चोरी करण्यात आली होती. यात दोन भारतीय वंशाच्या नागरिकांचाही समावेश असल्याचेही आता समोर येत आहे. या दरोड्यात चोरांनी एकूण 400 किलो सोने चोरी केले होते. या सोन्याचे मूल्य  20 दशलक्ष कॅनडा डॉलर होते. कॅनडाच्या टोरॅन्टो विमानतळावरून ही चोरी करण्यात आली होती. याच प्रकरणात पोलिसांनी आता एकूण सहा लोकांवर अटकेची कारवाई केली आहे. नेटफिल्सवर असलेल्या मनी हाईस्ट या बेव सिरीरची प्रेरणा घेऊन चोरांनी ही चोरी केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.


नेमकं प्रकरण काय आहे?


कॅनडात टोरॅन्टो हे सर्वांत मोठे विमानतळ आहे. या विमानतळावर 17 एप्रिव 2023 रोजी ही चोरी करण्यात आली होती. या सोन्याची किंमत तब्बल 20 दशलक्ष कनाडाई डॉलर होती. सोन्यासह दरोडेखोरांनी विदेशी चलनदेखील पळवले होते. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कॅनडा पोलीस दिवसरात्र मेहनत करत होते. प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी अमेरिकेच्या पोलिसांचीही मदत घेण्यात आली होती. साधारण वर्षभर तपास केल्यानंतर आता पोलिसांना या प्रकरणात मोठे यश आले आहे. यात सहापैकी पाच लोकांना कॅनडातून अटक करण्यात आलेलं आहे. उरलेल्या एका व्यक्तीला अमेरिकेतील पेंसिल्वेनिया राज्यातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 


दोन भारतीय वंशाच्या नागरिकांचा समावेश  


कॅनडा पोलिसांनी अटक केलेल्या एकूण सहा आरोपींपैकी दोन आरोपी हे भारतीय वंशाचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार एअर कॅनडाचा कर्मचारी असलेला परमाल सिद्धू  आणि भारतीय वंशाचा अमित जलोटा (हा सध्या कॅनटाचा नागरिक आहे) अशी या दोघांची नावे आहेत. याच प्रकरणात भारतीय वंशांची सिमरन प्रीत पनेसर या एअर कॅनडाच्या माजी कर्मचाऱ्याचा शोध चालू आहे.


चोरी कशी केली?


स्वीस बँक रायफिसेन आणि वालकॅम्बी या दोन बँकांकडून 400 किलो सोने आणि विदेशी चलन 17 एप्रिल स्वित्झर्लंडच्या झ्यूरिचपासून कॅनडाच्या टोरॅन्टो येथे नेण्यात आले होते. या सोन्याच्या सुरक्षेची जबाबदारी ब्रिंक या कंपनीवर सोपवण्यात आली होती. हे सोने आणि विदेशी चलन विमानतळाच्या स्टोअरेज डेपोमध्ये ठेवण्यात आले होते.  मात्र सोने ठेवल्यानंतर साधारण तीन तासांनी एका अज्ञात व्यक्तीने बनावट कागदपत्रे दाखवून या सोन्याची चोरी केली होती. ब्रिंक कंपनीचा खरा कर्मचारी सोने न्यायला आल्यानंतर या दरोड्याची सर्वांना कल्पना आली. ब्रिंक कंपनीच्या दाव्यानुसार एअर कॅनडाच्या कर्मचाऱ्यांनीच बनावट कागदपत्रे दाखवून ही चोरी केली आहे.